'जीव झाला वेडापिसा' मालिकेतील हेमंत जोशी यांचे कोविड19 मुळे निधन

अशातच एक वाईट बातमी आहे. तर मराठी मालिका 'जीव झाला वेडापिसा' मधील हेमंत जोशी यांचे कोविड19 मुळे निधन झाले आहे.

हेमंत जोशी यांचे निधन (Photo Credits-Facebook)

देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच नागरिकांना सुद्धा नियमांचे पालन करण्यास वारंवार सांगितले जात आहे. बॉलिवूड पासून ते मराठी कलाकारांना ही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अशातच एक वाईट बातमी आहे. तर मराठी मालिका 'जीव झाला वेडापिसा' (Jiv Zala Yeda Pisa) मधील हेमंत जोशी यांचे कोविड19 मुळे निधन झाले आहे. मालिकेत हेमंत जोशी यांनी भावे यांची भुमिका साकारली होती.

हेमंत जोशी यांच्या निधनाची माहिती त्यांच्या एका निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. जोशी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अवघ्या काही दिवसांमध्येच हेमंत यांचे निधन झाले आहे. तर हेमंत जोशी यांच्या निधनाची माहिती मिळताच मालिकेतील सर्व कलाकार भावूक झाले आहेत. तर आत्याबाईंची भुमिका साकारलेल्या चिन्मयी सुमित हिने एक फेसबुकवर भावूक पोस्ट ही जोशी यांच्यासाठी लिहिली आहे.(आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे च्या वडिलांचं कोविड 19 मुळे निधन)

तर काही दिवसांपूर्वीच अभिनेते अमोल धावडे यांचे  ही कोरोनामुळे निधन झाले. अमोल धावडे यांचे मित्र प्रविण तरडे यांनी फेसबूक पोस्ट च्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 15 दिवसांत कोरोनाने माझा धडधाकट मित्र खाल्ला असं सांगत जुन्या मित्राला गामावल्याचं दु:ख शेअर केले आहे. दरम्यान अमोल धावडे हे प्रविण तरडे हे जुने मित्र होते. कॉलेज जीवनापासून त्यांची मैत्री होती. प्रवीण तरडेंच्या प्रत्येक सिनेमामध्ये एक सीन तरी अमोल साठी लिहायचो असे त्यांनी या पोस्ट मध्ये लिहले होते.