Into The Wild With Bear Grylls and Superstar Rajinikanth Promo: बंदिपूर जंगलामध्ये साहसी स्टंट्सने प्रेक्षकांना थक्क करणार सुपरस्टार रजनीकांत (Watch Video)
Into The Wild With Bear Grylls and Superstar Rajinikanth । Photo Credits: Twitter

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत Bear Grylls सोबत Man Vs Wild मध्ये झळकणार असल्याचं समजल्यापासून त्यांच्या फॅन्समध्ये या एपिसोडबद्दल विशेष उत्सुकता होती. आज टेलिकास्ट करण्यात आलेल्या एपिसोडच्या झलक मध्ये या शोच्या प्रिमियरची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आजच्या टीझरमध्ये हा एपिसोड 23 मार्च दिवशी रात्री 8 वाजता टेलिकास्ट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रजनीकांत यांनी डिस्कव्हरी चॅनलवर 'Into The Wild'मध्ये खास एपिसोडमध्ये काम केलं होतं. त्यानंतर आता अनेक वर्षांनी Man Vs Wild मध्ये रजनीकांतची पुन्हा झलक पहायला मिळणार आहे. 'Into The Wild With Bear Grylls and Superstar Rajinikanth,असं नाव जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये रजनीकांत आणि बिअरच्या धमाल आणि रंजक एपिसोडची झलक दाखवणारा खास टीझर आज ट्वीटरच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे.

कर्नाटकच्या बंदिपूर जंगलामध्ये (Bandipur Forest) रजनीकांत सोबतच्या स्पेशल एपिसोडचं शूटिंग करण्यात आलं आहे. Bear Grylls सोबत सुपरस्टार रजनीकांत जंगलाच्या रस्त्यांवर बाईक राईड करताना दिसत आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये साहस आणि धम्माल एकत्र पहायला मिळणार आहे. 'सज्ज व्हा तुम्हांला अनोख्या अनुभवाला सामोरं जायचं आहे.' अशा आशयाचा संदेश देखील दिला असल्याने आता या एपिसोडबद्दल उत्सुकता वाढली आहे. कर्नाटक: 'Man vs Wild' च्या शूटिंग दरम्यान रजनीकांत यांना दुखापत.  

इथे पहा 'Into The Wild With Bear Grylls and Superstar Rajinikanth,'चा टीझर

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकींच्या धामधूमीमध्ये आता नरेंद्र मोदींचा एपिसोड झाला होता. 12 ऑगस्ट 2019 दिवशी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनेलवर हा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला होता. दरम्यान रजनीकांत यांच्या पाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी स्टार अक्षय कुमार देखील बेअर ग्रील्सच्या शोमध्ये झळकणार असल्याचं वृत्त आहे. अभिनेते रजनीकांत नुकतेच तमिळ चित्रपट 'दरबार' मध्ये झळकले होते. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. आता रजनीकांत हे Thalaivar 168 या अगामी सिनेमासाठी तयारी करत आहेत. या सिनेमामध्ये कीर्ती सुरेश, मीना आणि खुशबू झळकणार आहेत. पण त्या सिनेमापूर्वी रजनीकांत यांचा 'वाईल्ड' अंदाज त्यांच्या रसिकांसमोर येणार आहे.