Mirzapur 2: जर कालीन भैय्या बाप बनू शकत नाहीत, तर मुन्ना भैय्या कोणाचा मुलगा आहे? दिव्येंदु शर्मा दिलं 'हे' उत्तर

'मिर्जापूर 2' या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिवाय सोशल मीडियावर या सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. या शो संदर्भात लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मिर्जापूरच्या दुसऱ्या सीझनमधील एका दृश्यात पंकज त्रिपाठी उर्फ ​​कालीन भैय्या (Kaleen Bhaiya) बाप होऊ शकत नाहीत, हे समोर आलं होतं. गुप्त रोगाने ग्रस्त असलेल्या कालीन भैय्याचे हे दृश्य अतिशय मजेदार आहेत. हे दृश्य पाहून नेटीझन्स सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहे की, जर कालीन भैय्या बाप होऊ शकत नाहीत, तर मग मुन्ना भैय्या (Munna Bhaiya) कोणाचा मुलगा आहे?

पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदु शर्मा (Photo Credits: Instagram)

Mirzapur 2: 'मिर्जापूर 2' या वेब सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिवाय सोशल मीडियावर या सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. या शो संदर्भात लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मिर्जापूरच्या दुसऱ्या सीझनमधील एका दृश्यात पंकज त्रिपाठी उर्फ ​​कालीन भैय्या (Kaleen Bhaiya) बाप होऊ शकत नाहीत, हे समोर आलं होतं. गुप्त रोगाने ग्रस्त असलेल्या कालीन भैय्याचे हे दृश्य अतिशय मजेदार आहेत. हे दृश्य पाहून नेटीझन्स सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहे की, जर कालीन भैय्या बाप होऊ शकत नाहीत, तर मग मुन्ना भैय्या (Munna Bhaiya) कोणाचा मुलगा आहे?

या प्रश्नामुळे सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, मुन्ना भैय्याची भूमिका साकारणार्‍या दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) ने याबद्दल खुलासा केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत मुन्ना भैय्या यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर मुन्नाने मजेशीर उत्तर दिलं. (हेही वाचा - Deepika Padukone Blasts at Paparazzi: गाडीचा पाठलाग करणाऱ्या पॅपराझी वर भडकली दीपिका पदुकोण; दिला कायदेशीर कारवाईचा इशारा- रिपोर्ट)

मुन्नाने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं आहे की, "मला असे वाटते की त्या काळात पप्पांची तब्येत बरीच चांगली झाली असावी. कारण, यात मुन्ना भैय्याचं वय 27 दाखवलं आहे. त्यामुळे मला वाटते की, 27 वर्षांपूर्वी ते निरोगी असतील. त्यानंतर कामाचा भार तसेच तणावामुळे कदाचित कॉम्लीकेशन्स आलं असावं. परंतु, त्यावेळी ते तरूण नक्कीचं असतील."

दरम्यान, मिर्जापूर 2 सीझननंतर प्रेक्षक आता त्याच्या तिसर्‍या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्या यांचा चॅप्टर संपल्यानंतर आता या सीरिजची कथा गुड्डू पंडित (अली फजल), माधुरी यादव (ईशा तलवार), बीना त्रिपाठी (रसिका दुग्गल) आणि गजमिनीमिनी गुप्ता (श्वेता त्रिपाठी) यांच्या भोवती फिरताना दिसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement