Bigg Boss 13 च्या मंचावर अनन्या पांडे ची जीभ घसरली; पाहा काय म्हणाली या व्हिडिओमध्ये (Watch Video)
त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Weekend Ka Vaar च्या एपिसोडमध्ये 'पती पत्नी और वो' या आगामी चित्रपटातील कलाकारांनी येऊन शोमध्ये अधिकच रंगात आणली.
Bigg Boss 13 या शोमधील रंगात दिवसागणिक अधिकच वाढताना दिसत आहे. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Weekend Ka Vaar च्या एपिसोडमध्ये 'पती पत्नी और वो' या आगामी चित्रपटातील कलाकारांनी येऊन शोमध्ये अधिकच रंगात आणली. अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर हे तीनही कलाकार बिग बॉसच्या सेटवर आले होते आणि त्यांनी सलमान सोबत मिळून धमाल देखील केली. परंतु या एपिसोडमध्ये असं काही घडलं ज्यामुळे, अनन्य पांडे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सलमानने दिलेल्या एका टास्कमध्ये अनन्याची जीभ घसरली, आणि बिग बॉसच्या घरात 'मैं पॉर्न चाहती हूँ' असं ती म्हणाली.
अनन्या पांडेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बिग बॉस फॅन्ससाठी चर्चेचा विषय बनला आहे. म्युझिक चालू असताना, सलमान काय बोलतो हे अनन्याला ओळखायचे होते. परंतु 6 वेळा प्रयत्न करून देखील तिने प्रत्येक वेळी चुकीचंच उत्तर दिलं. एका वेळी तर 'मैं पॉर्न चाहती हूँ' असं ती म्हणून गेली. पाहा अनन्याचा हा व्हिडिओ,
लमान ने मात्र एकच प्रयत्नात अनन्या काय म्हणायचं प्रयत्न करत आहे ते ओळखलं. दरम्यान, कार्तिक आणि भूमि यांच्यातही एक मजेशीर किस्सा घडला. भूमी जेव्हा कार्तिकला ओळखायला सांगत होती तेव्हा त्याचं लक्ष मात्र सलमानच्या ओठांकडे होतं.