कोण आहे ही सौंदर्या इनामदार? हिचा अक्कासाहेबांशी नक्की संबंध काय? वाचा सविस्तर...

पाहूया हर्षदा यांचं हे नवं पात्र कसं असणार आहे.

Harshada Khanvilkar (Photo Credits: File Image)

अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी साकारलेलं अक्कासाहेब हे पात्र घराघरात पोहोचलं. त्या पात्राची प्रसिद्धी इतकी होती की मालिका संपून इतके वर्ष होऊनही आजही ते लोकांच्या मनात तितकंच जिवंत आहे. त्याच अक्कासाहेब अर्थात हर्षदा खानविलकर पुन्हा येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला एका नव्या रूपात आणि एका नव्या पत्रासह. 'रंग माझा वेगळा' या नव्या मालिकेतून त्या 'सौंदर्या इनामदार'च्या रूपात आपल्या समोर येणार आहेत. पाहूया हर्षदा यांचं हे नवं पात्र कसं असणार आहे.

तुमच्या मालिकेतल्या नव्या लुक बद्दल काय सांगाल?

पुढचं पाऊल मालिकेचा पेहराव मी स्वत: डिझाईन केला होता. यावेळेस मात्र मालिकेची संपूर्ण टीम आणि आमची कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्ये यांनी माझ्या लुकवर मेहनत घेतली आहे. सौंदर्या इनामदार ही एक बिझनेस वुमन आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेला शोभेल असा पेहराव डिझाईन करण्यात आला आहे. अतिशय मॉडर्न पण परंपरेला धरुन असा मिलाफ साधण्याचा प्रयत्न सौंदर्याच्या लूकसाठी करण्यात आला आहे. आता पर्यंत अक्कासाहेबांच्या भूमिकेमधून प्रेक्षकांनी मला पारंपरिक रुपात पाहिलंय. आता रंग माझा वेगळा मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

तुमच्या व्यक्तिरेखविषयी काय सांगाल?

सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा मी साकारत आहे. अतिशय हुशार आणि करारी अशी ती बिझनेस वुमन आहे. तिच्या नावातच सौंदर्य असल्यामुळे सौंदर्यावर प्रेम करणारी अशी ही व्यक्तिरेखा आहे. तुम्ही सुंदर असाल तर तुम्ही जगावर राज्य करु शकता असं तिचं ठाम मत आहे. तिच्या आयुष्यात काळ्या रंगाला अजिबात स्थान नाही. काळ्या रंगाचा तिटकारा असणाऱ्या सौंदर्याच्या आयुष्यात जेव्हा तिचा लाडका मुलगा सुनेच्या रुपाने काळा रंग घेऊन येतो तेव्हा तिच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होते याची गोष्ट ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून उलगडेल.

प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवणारी अग्निहोत्र पुन्हा 'स्टार' प्रवाही; दुसऱ्या Season मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेचं कथानक नक्की काय असेल?

कितीही नाकारलं तरी समाजात वर्णभेद हा आहेच. आपण कितीही प्रगती केली तरी हा फरक प्रत्येक स्तरात पाहायला मिळतो. परंतु शरीराचा रंग तुमची चमक दाखवू शकत नाही तर तुमच्या गुणांमुळे ती चमक दिसते हा संदेश मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे. या मालिकेतली नायिका अर्थातच दिपा तिच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या गुणांमुळेच सर्वांचं मन जिंकते. काळ्या रंगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला ही मालिका तुम्हाला भाग पडेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif