Devoleena Bhattacharjee Blessed With Baby Boy: 'गोपी बहू' बनली आई! देवोलिना भट्टाचार्जीने लग्नाच्या 2 वर्षानंतर दिला गोंडस मुलाला जन्म
पती शाहनवाज शेख याला टॅग करत तिने आपल्या मुलाच्या आगमनाची आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Devoleena Bhattacharjee Blessed With Baby Boy: 'साथ निभाना साथिया' या टीव्ही मालिकेत गोपी बहू म्हणून घराघरात ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. लग्नाच्या दोन वर्षानंतर ही अभिनेत्री आई झाली आहे. देवोलीनाने 18 डिसेंबरला मुलाला जन्म दिला. पती शाहनवाज शेख याला टॅग करत तिने आपल्या मुलाच्या आगमनाची आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
देवोलीनाने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी -
देवोलिना भट्टाचार्जीने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक मोशन व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तिने आपल्या मुलाच्या स्वागताची बातमी दिली. मोशन पोस्टरमध्ये बाळाची आकृती, फुगे, टेडी बेअरचे चित्र दिसत आहे. या पोस्टला तिने कॅप्शन लिहिले आहे की, 'हे सांगताना खूप आनंद होत आहे की 18 डिसेंबर रोजी आमच्या घरात गोंडस मुलाचा जन्म झाला आहे.' देवोलीनाच्या या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. बिग बॉस 13 फेम पारस छाबरा, दीपिका सिंह, आरती सिंह, काम्या पंजाबी, जय भानुशाली आणि देवोलीनाचा 'साथ निभाना साथिया'मधील सहकलाकार अहम जी अर्थात अभिनेता नाझिम खिलजी यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. (हेही वाचा -Devoleena Bhattacharjee Announce Pregnancy : साथ निभाना साथिया फेम 'देवोलिना भट्टाचार्जी' होणार आई, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली गूड न्यूज)
शानवाज शेखसोबत लग्न केल्यानंतर देवोलीवर टीका -
देवोलीनाने डिसेंबर 2022 मध्ये तिचा जिम ट्रेनर बॉयफ्रेंड शानवाज शेखसोबत कोर्ट मॅरेज केले होते, ज्यामध्ये फक्त तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या लग्नामुळे अभिनेत्रीला धार्मिक टीकेला सामोरे जावे लागले. आंतरधर्मीय विवाहामुळे तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि तिला चांगलेच ट्रोल केले गेले. (Bigg Boss OTT 3: दोन बायकांसोबत बिग बॉसमध्ये येणाऱ्या यु्ट्यूबरवर देबोलिना भट्टाचार्य भडकली)
देवोलीनाने टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर -
ऑक्टोबर 2023 मध्ये मीडियाला दिलेल्या मुलाखतीत देवोलीनाने ट्रोल्सना उत्तर देताना म्हटले होते की, 'जर मी श्रीमंत माणसाशी लग्न केले असते, तर मला नाव ठेवली असती.' देवोलीनाला साथ निभाना साथिया या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर, तिने सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 13 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.