Bigg Boss 13: बिग बॉस 13 चा विजेता म्हणून गुगलने केली असीम रियाझच्या नावाची घोषणा; शेहनझ गिल ठरली उत्तेजनार्थ
पडल्यावर जो सर्वात तगडा सदस्य घरात आहे तो म्हणजे असीम रियाझ (Asim Riaz) महत्वाचे म्हणजे आता गुगलने असीमलाच बिग बॉस 13चा विजेता घोषित केले आहे. सोबतच शेहनाझ गिल (Shehnaaz Gill) ही उत्तेजनार्थ ठरली आहे
भारतातील सर्वात विवादित रियालिटी शो बिग बॉस 13 (Bigg Boss 13) आता एका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. मागच्या वर्षी बिग बॉस शो पूर्णतः अयशस्वी ठरल्याने यंदा या शोमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. शोचे फॉरमॅट काही प्रमाणात बदलण्यात आले आहे. आता देवोलीन, रश्मी आणि सिद्धार्थ शुक्ला घरातून बाहेर पडल्यावर जो सर्वात तगडा सदस्य घरात आहे तो म्हणजे असीम रियाझ (Asim Riaz) महत्वाचे म्हणजे आता गुगलने असीमलाच बिग बॉस 13चा विजेता घोषित केले आहे. सोबतच शेहनाझ गिल (Shehnaaz Gill) ही उत्तेजनार्थ ठरली आहे. विश्वास बसत नाही ना? मग हा फोटो पहाच
गुगलला माहितीचे भांडार म्हटले जाते. दिवसभरातील अनेक गोष्टींसाठी आपण गुगलवर अवलंबून असतो. मात्र आता गुगलने शोच्या मध्यावरच असीमला बिग बॉस 13 चा विजेता घोषित केल्याने, गुगलच्या माहितीवर विश्वास ठेवायचा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मनाला जात होता. मात्र अचानक तो शोमधून बाहेर पडल्यावर तडकाफडकी गुगलने असीमला शोचा विजेता घोषित केले आहे. (हेही वाचा: बिग बॉस 13 च्या 'Bed Friends Forever'या कन्सेप्टला करणी सेनेचा विरोध, सलमान खानच्या घराबाहेर घोषणाबाजी करणा-या 20 जणांना अटक)
दरम्यान, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये असीम आपला ठसा उमटवण्यात कमी पडला. मात्र पारससोबत झालेल्या भांडणानंतर त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा प्रेक्षकांना दिसून आल्या. पुढे प्रत्येकवेळी स्वतःची मते ठामपणे मांडल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच भर पडली. दुसरीकडे गुगलने पहिली उत्तेजनार्थ घोषित केलेली शहनाझ अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिच्या एकूणच व्यक्तिमत्वामुळे अगदी कमी वेळात तिने आपला खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)