Fire Breaks Out On Anupamaa Set: मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर भीषण आग; AICWA ची निर्मात्यांवर कारवाईची मागणी (Video)

या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने कडक भूमिका घेतली आहे. संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगीची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

Fire Breaks Out On Anupamaa Set: मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर भीषण आग; AICWA ची निर्मात्यांवर कारवाईची मागणी (Video)
Fire Breaks Out On Anupamaa Set

आज, सोमवारी (23 जून) सकाळी मुंबईतील (Mumbai) गोरेगाव येथे असलेल्या फिल्म सिटीमध्ये (Film City) रुपाली गांगुलीच्या लोकप्रिय 'अनुपमा' (Anupamaa) या टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. शूटिंग सुरू होण्याच्या दोन तास आधी पहाटे 5 वाजता लागलेल्या आगीत सेट पूर्णपणे जळून खाक झाला. त्यावेळी, कर्मचारी आणि क्रू सेटवर दिवसाची तयारी करत होते. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शूटिंगवेळी अशी घटना घडली असती तर, परिणाम खूपच वाईट झाला असता. सुरुवातीच्या माहितीनुसार, पहाटे लागलेल्या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आग विझविण्यासाठी एकूण चार अग्निशमन इंजिन, चार जंबो टँकर (जेटी), एक सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी (एडीएफओ) आणि तीन स्टेशन अधिकारी तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनुपमा मालिकेचा सेट दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हाथी गेट येथील मराठी बिग बॉसच्या सेटच्या मागे आहे. बीएमसीच्या एमएफबीनुसार, अनुपमा सेटवरील तंबूच्या रचनेत आग लागली व नंतर ही आग वाढली. सकाळी 6.26 वाजता आगीला लेव्हल-1 ची आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली.

Fire Breaks Out On Anupamaa Set:

या घटनेमुळे मुंबईतील फिल्म स्टुडिओमध्ये वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याद्वारे पुन्हा एकदा निर्मिती संस्था आणि अधिकाऱ्यांचा मूलभूत सुरक्षेबाबतचा निष्काळजीपणा दिसून येतो. उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे की, स्टुडिओ अनेकदा अग्निशमन तपासणीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे दररोज शेकडो कर्मचारी आणि कलाकार धोक्यात येतात.

Fire Breaks Out On Anupamaa Set:

या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने कडक भूमिका घेतली आहे. संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगीची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. असोसिएशनने फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबईचे कामगार आयुक्त यांना तात्काळ निलंबित करण्याची, तसेच निर्माते, प्रॉडक्शन हाऊस, टेलिव्हिजन चॅनेल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने या सर्वांवर अग्निसुरक्षा प्रोटोकॉल आणि इतर अनेक आरोपांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 10:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).