TV Actor Rashmirekha Ojha Dead: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची राहत्या घरी आत्महत्या
पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरातून ताब्यात घेतला केला.
TV Actor Rashmirekha Ojha Dead: मनोरंजन क्षेत्रातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या बातमीने सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. ओडिया टीव्ही अभिनेत्री रश्मिरेखा ओझा (Rashmirekha Ojha) हिने ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. रश्मिरेखा यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरातून ताब्यात घेतला केला.
रश्मिरेखा ओझा हिने पंख्याला लटकून जीव दिला आहे. रात्री 10.30 च्या सुमारास त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. मात्र, कथित आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात या संपूर्ण प्रकरणाला प्रेमाचे नाव दिले जात आहे. प्रेम प्रकरणावरून रश्मिरेखाने आत्महत्येसारखे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. वृत्तानुसार, पोलिसांना रश्मिरेखा यांची सुसाईड नोटही सापडली आहे. (हेही वाचा - अभिनेत्री Ketaki Chitale ला जामीन मंजूर; महिला आयोगाने पाठवली महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस)
रिपोर्ट्सनुसार, रश्मिरेखा ओझा राजधानी भुवनेश्वरच्या नयापल्ली भागात भाड्याच्या घरात राहत होती. त्याच घरात त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दुसरीकडे, रश्मिरेखाच्या वडिलांनी मुलीच्या प्रियकरावर आरोप करत म्हटले की, 'प्रियकर संतोष रश्मिरेखासोबत पतीसारखा राहत होता. संतोषने आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे,' असा आरोपही रश्मिरेखाच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान, 23 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह भुवनेश्वरच्या नयापाली भागात तिच्या भाड्याच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या वडिलांनी या प्रकरणात लिव्ह-इन पार्टनरचा हात असण्याची भीती व्यक्त केली आहे.