Fallon Guliwala Detained By Customs Department: 'बिग बॉस' Ajaz Khan ची पत्नी फॅलन गुलीवालाला ड्रग्ज प्रकरणात अटक; छाप्यावेळी घरात सापडले अंमली पदार्थ, अभिनेत्याचा शोध सुरू

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार आणि गुरुवारी एजाज खानच्या जोगेश्वरी येथील घरावर छापा टाकला. हे घर फॉलन एजाज गुलीवाला हिच्या नावावर आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फॅलन गुलीवालाच्या फ्लॅटची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे काही ड्रग्ज आणि 11 लाख रुपये रोख सापडले.

Fallon Guliwala Detained By Customs Department: 'बिग बॉस' Ajaz Khan ची पत्नी फॅलन गुलीवालाला ड्रग्ज प्रकरणात अटक; छाप्यावेळी घरात सापडले अंमली पदार्थ, अभिनेत्याचा शोध सुरू
Ajaz Khan (Photo Credits: X)

Fallon Guliwala Detained By Customs Department: बिग बॉस 7 फेम अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याआधी अनेकवेळा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. बिग बॉसचे घर, तसेच वास्तविक जीवनातही त्याला एक वादग्रस्त व्यक्तिमत्व समजले जाते. आता त्याची पत्नी फॅलन गुलीवाला (Fallon Guliwala) अडचणीत आली आहे. तिला कस्टम विभागाने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्या मुंबईतील जोगेश्वरी येथील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला व त्यावेळी अधिकाऱ्यांनी 130 ग्रॅम गांजासह विविध अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती आहे. फॅलन ही परदेशी नागरिक आहे. याआधी 8 ऑक्टोबर रोजी अभिनेता एजाज खानचा कर्मचारी सूरज गौर यालाही अटक करण्यात आली होती. सूरजवर 100 ग्रॅम मेफेड्रोन (MD) कथितरित्या ऑर्डर केल्याचा आरोप होता.

त्याने कुरिअरच्या माध्यमातून युरोपियन देशातून ही ऑर्डर मागवल्याची माहिती आहे. हे उत्पादन एजाजच्या अंधेरी येथील कार्यालयात पोहोचवण्यात आले. सूरज गौर विरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार आणि गुरुवारी एजाज खानच्या जोगेश्वरी येथील घरावर छापा टाकला. हे घर फॉलन एजाज गुलीवाला हिच्या नावावर आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फॅलन गुलीवालाच्या फ्लॅटची झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे काही ड्रग्ज आणि 11 लाख रुपये रोख सापडले. त्यानंतर टिळा अटक करण्यात आली. एजाज खानच्या घरातून ड्रग्ज सापडल्यानंतर आणि त्याच्या पत्नीला अटक केल्यानंतर, एजन्सी आता अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यासाठी त्याचा शोध घेत आहे. पण तो बेपत्ता आहे. (हेही वाचा: Pornography Case: पोर्नोग्राफी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज कुंद्रा, Shilpa Shetty हिच्या घरी ईडीचे छापे)

फॉलनच्या अटकेनंतर एजाज खान इंस्टाग्रामवर लाइव्ह आला आणि अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला अन्यायकारकपणे लक्ष्य केल्याचा आरोप केला. याआधी 2021 मध्येही एजाज खान अशाच प्रकरणामुळे प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी एनसीबीने त्याला 4.5 ग्रॅम वजनाच्या अल्प्राझोलमच्या 31 गोळ्यांसह ड्रग्ज प्रकरणात अटक केली. सुमारे 26 महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याची सुटका झाली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2024 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).