एकता कपूरची मंदिराबाहेरील गरिबांना अपमानास्पद वागणूक; हाताचा स्पर्श न होता दुरूनच वाटली केळे (Video)

एकता कपूर ही देवाची फार मोठी भक्त आहे, हे आपण अनेकवेळा पहिले आहे. सध्या एकता कपूरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकता कपूर मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना केळी वाटताना दिसत आहे.

Ekta Kapoor (Photo Credits: Twitter)

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) नेहमीच तिच्या, डेली सोप आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. एकता कपूर ही देवाची फार मोठी भक्त आहे, हे आपण अनेकवेळा पहिले आहे. सध्या एकता कपूरचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एकता कपूर मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना केळी वाटताना दिसत आहे.

मात्र आता एकता कपूर तिच्या व्हिडिओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, एकता गरिबांमध्ये केळी वाटताना लोकांचा स्पर्श आपल्याला होऊ नये याची खबरदारी घेत आहे.

पहा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

The gap between a celebrity and a pap has totally narrowed down now. The celebs happily pose for us and even chat with us. We feel very comfortable clicking them. But what when the public gets too close to comfort? #ektakapoor too was giving out bananas to the beggars outside the temple and she happily agreed to give pictures to the public, even though the bodyguard refused. But then she suddenly walked away. Watch here why?

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या व्हिडीओमध्ये ज्याप्रकारे एकता कपूर केळी वाटत आहे ते पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लोक या पोस्टवर कमेंट करत, एकताच्या या वागण्यावर आपला आक्षेप नोंदवत आहेत. एक व्यक्ती लिहितो, 'वाह! केळी देण्याचा हा चांगला मार्ग आहे, लोकांच्या हातावर ती फेकणे. जर तुला असे वाटत असेल की, अशा लोकांना स्पर्श केल्याने तुला कोणता आजार होईल, तर अशी कृत्ये करूच नयेत.' दुसऱ्याने लिहिले आहे, 'केळी देऊन असे वाटत आहे की गरिबांवर जणू काही उपकार करत आहे.' (हेही वाचा: अखेर करिश्मा कपूरला काम मिळाले; Mentalhood वेब सिरीजद्वारे पुनरागम, साकारणार तीन मुलांच्या आईची भूमिका (Video))

अशाप्रकारे एकताच्या वागण्यावर अनेक जण नाराज झाले आहेत. मात्र दुसरीकडे जेव्हा तिचे चाहते तिच्यासोबत एक फोटो क्लिक करण्याची विनंती करतात, तेव्हा ती आनंदाने त्यांना फोटो देताना दिसून येत आहे. हे पाहून तर एकताच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. दरम्यान, नुकतेच एकताने आपल्या ALT बालाजीच्या 'मेंटलहुड' या मालिकेचा टीजर प्रदर्शित केला आहे, यामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now