मुंबई: नशेच्या धुंदीत टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने चालवली कार, सात वाहनांना दिली धडक (Video)

या व्हिडिओत काही लोक एका कारभोवती एकत्र आलेले दिसतात. तसेच, हे लोक मोठमोठ्याने चर्चाही करताना दिसतात. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु केल्याचे म्हटले आहे.

Drunk TV Actor's Ruhi Singh Speeding Car Hit 7 Vehicles In Mumbai | (Photo Credit: You Tube)

नशेच्या अंमलाखाली कार चालवत एका टीव्ही अभिनेत्रीने (TV Actor) रस्त्यावरील सात वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रूही शैलेशकुमार सिंह (Ruhi Singh, वय 30 वर्षे) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ही घटना मंबई (Mumbai) येथील सांताक्रूझ (Santacruz) परिसरात घडली.

पोलीस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेत अभिनेत्रीच्या कारची धडक बसलेल्या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही व्यक्ती जखमी झाले नाही. तसेच, कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही लोक एका कारभोवती एकत्र आलेले दिसतात. तसेच, हे लोक मोठमोठ्याने चर्चाही करताना दिसतात. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरु केल्याचे म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, रुही ही काही टीव्ही मालिकांसाठी अभिनेत्री म्हणून काम करते. ही घटना घडली त्या दिवशी रुही आणि तिच्या दोन मित्रांसोबत (राहुल आणि स्वप्निल) पश्चिम मुंबईतील एका उपनगरात असलेल्या क्लबमधून परतत होते. दरम्यान, वांद्रे येथील एका मॉलमधील टॉयलेट वापरण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. मात्र, मॉलच्या कर्मचाऱ्यांनी रुही हिला मॉलमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. या वेळी त्यांनी गोंधळ घातल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली.(हेही वाचा, व्हिडिओ: राहुल गांधी यांनी स्वत: पुसले अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याचे रक्त)

दरम्यान, पोलीसांनी रुहीच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. तर रुही आणि तिच्या अन्य एका मित्राला सोडून दिले. या वेळी रुही आपल्या कारमध्ये बसली मात्र कार चावत असलेल्या रुहीने सात वाहनांना धडक दिली. या वेळी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही रुहिने केला. मात्र, रुही आणि तिच्या मित्रांनीच पोलीसांवर हात उगारल्याचे प्रत्यक्षदर्शांनी म्हटल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.

अभिनेत्री आणि तिच्या मित्रांवर भा. दं. स. कलम 353 अन्वये (शासकीय कामात अडथळा, हल्ला, हल्ल्याचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीवर नशेच्या अंमलाखाली गाडी चालविल्याबद्दल भा. दं. सं. 279 अन्वये गुन्हाही दाखल केला आहे.