Bharti Singh नंतर Drugs Case मध्ये Kapil Sharma सुद्धा अटक होणार असल्याचे म्हणत युजर्सने केले Troll, कॉमेडियनने दिले 'हे' प्रतिउत्तर
Kapil Sharma Trolled: ड्रग्ज प्रकरणी प्रसिद्धा कॉमेडियन भारती सिंह हिला अटक करण्यात आल्यानंतर सोशल मीडियात कपिल शर्मा याला ही टार्गेट केले जात आहे. भारती हिने कपिल सोबत त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये दिसून येत होती. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीच्या टीमने मुंबईतून अटक केली होती. मात्र नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. या प्रकरणी आता कपिल शर्मा याला सुद्धा तुफान ट्रोल केले जात आहे.(Users Trolled Kapil Sharma: ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहला अटक झाल्यानंतर सोशल मिडियावर कपिल शर्मा ट्रोल, पहा ट्वीट्स)
ट्विटवर काही लोकांनी कपिल शर्माची मस्करी केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, पुढील नंबर कपिलचा असू शकतो. अशाच पद्धतीचे एक ट्विट पाहिल्यानंतर कपिल शर्मा याने त्याचे सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. मात्र त्याने आपले ट्विट काही कारणास्तव नंतर डिलिट केले.(Bharti Singh-Haarsh Limbachiyaa: भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर)
एनसीबीने भारती आणि हर्ष यांच्या घरी धाड टाकल्यानंतर घरातून गांजा जप्त करण्यात आला. तसेच या दोघांना एनसीबीने चौकशीसाठी बोलावले असता त्यांनी आपण गांजाचे सेवन केल्याचे स्विकार केले. यावर त्यांची मेडिकल टेस्ट केल्यानंतर दोघांना मुंबईतील एका कोर्टात हजर करण्यात आले होते. भारती आणि हर्ष या दोघांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करत त्यांना 4 डिसेंबर पर्यंत तुरुंगात पाठवले होत. त्यामुळे या दोघांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने या दोघांचा अर्ज स्विकारत त्यांना जामिन मिळाला.