'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राजांवरील छळाचा भाग रद्द, डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्जुन खोतकरांना दिली माहिती
त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती
झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका सध्या अंतिम टप्प्यात असून छत्रपती संभाजी राजांवर औरंगाजेबाकडून होणारा छळ यात दाखविण्यात येत आहे. हा भाग प्रसारित करु नये याने मराठ्यांच्या भावना तर दुखावल्या जातीलच शिवाय हे पाहणे प्रत्येक मराठी माणसाला पाहणे सहन होणार नाही, अशी मागणी जालन्यातील शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्यांच्या मागणीला मान देत हा भाग वळगणार असल्याचे आश्वासन डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी खोतकरांना सांगितल्याचे कळतय.
संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती. Video: 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार या भावनेने डॉ. अमोल कोल्हे यांना अश्रू झाले अनावर; पत्रकार परिषदेत दाटून आल्या भावना
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपू नये असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटत होते. संभाजी राजांना औरंगाजेबाने दिलेल्या मरणयातना यात दाखविण्यात येणार होत्या. मात्र तसे दाखवले जाऊ नये याने मराठ्याच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत होते. ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत आहे अशाही चर्चा होत्या. मात्र या केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं ट्विट करत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका आता प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून पसंती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळत आहे.