Coronavirus Lockdown मध्ये दूरदर्शन TRP मध्ये अव्वल; रामायण, महाभारत या मालिकांमुळे प्रेक्षकांची डीडी नॅशनल चॅनलला पसंती
मात्र यात डीडी टीव्ही चॅनेल अव्वल ठरले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही डीडी चॅनेलचा टीआरपी सर्वाधिक आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घेण्यात आल्याने अनेक लोक घरातच आहेत. घराबाहेर पडण्याची मुभा नसल्याने दिवसभर कंटाळलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी टीव्ही चॅनेल्सवर जुन्या कार्यक्रमांची मेजवानी सुरु करण्यात आली आहे. मात्र यात डीडी टीव्ही चॅनेल अव्वल ठरले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यातही डीडी चॅनेलचा टीआरपी सर्वाधिक आहे. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर रामायण, महाभारत या मालिका सुरु करण्यात याव्या अशी मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. चॅनेलकडून या मागणीची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर चाणक्य, शक्तीमान, श्रीमान श्रीमती या जुन्या लोकप्रिय मालिका सुरु करण्यात आल्या. त्यामुळेच जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच BARC च्या टीआरपी रिपोट्समध्ये डीडीने सर्वोच्च स्थान पटकावले आहे.
याची माहिती खुद्द प्रसार भारतीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. सलग दुसऱ्यांदा डीडी नॅशनल टीआरपीच्या बाबतीत नंबर 1 ठरला आहे. इंडिया फाईट्स कोरोना विथ दूरदर्शन या पोस्टरसह ही माहिती शेअर करण्यात आली आहे. तसंच टीआरपीची नंबर्सही देण्यात आले आहेत. 13 आठवड्यात 1.5 बिलियन तर 14 आठवड्यात 1.9 बिलियन इतक्या टीआरपीची नोंद करण्यात आली आहे. यावरुन कोरोना लॉकडाऊन काळात प्रेक्षकांनी दूरदर्शनवरील कार्यक्रमांना विशेष पसंती दिली आहे हे दिसून येते. (Ramayana Characters Memes: रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील 'कुंभकर्ण', 'लक्ष्मण' पात्रावरील मीम्सचा सोशल मीडियात पाऊस!)
प्रसार भारती ट्विट:
मात्र दूरदर्शनच्या या घवघवीत टीआरपी मागे रामायण, महाभारत या मालिकांचा सर्वाधिक वाटा आहे. कारण या मालिकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच मालिका, सिनेमांचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुन्या मालिकांचे प्रसारण चॅनल्सवर करण्यात येत आहे.