Coronavirus Impact: नियमित प्रसारित होणाऱ्या 'या' मालिका बंद; त्या ऐवजी एकता कपूरच्या 3 लोकप्रिय वेब सिरीज टीव्हीवर पाहण्याची संधी, जाणून घ्या वेळ

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सध्या देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहीर केले आहे. याचा फटका टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्व प्रकारचे शूटिंग आणि चित्रपट-मालिका निर्मितीवर सध्या बंदी आहे

Karrle Tu Bhi Mohabbat. (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सध्या देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊन जाहीर केले आहे. याचा फटका टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्व प्रकारचे शूटिंग आणि चित्रपट-मालिका निर्मितीवर सध्या बंदी आहे. अशा परिस्थितीत एकता कपूरला (Ekta Kapoor) तिच्या 'कुमकुम भाग्य' आणि 'कुंडली भाग्य' (Kumkum Bhagya and Kundali Bhagya) या दोन लोकप्रिय शोचे प्रसारण थांबविणे भाग पडले. मात्र या दोन शो ऐवजी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एकता नवीन शोद्वारे सज्ज झाली आहे. या दोन्ही शोच्या जागी एकताच्या वेब सीरिज 'कर ले तू भी मोहब्बत' व ‘केहने को हमसफर है’ सादर होणार आहेत.

कर ले तू भी मोहब्बत -

 

View this post on Instagram

 

Since we cannot make any more eps of #kumkumbhagya #kundalibhagya we have extended our family shows to @zeetv so 9 pm to 10 pm instead of karan preeta or abhi Pragya u will see tipsy n karan! we can’t do anything to help our viewers but entertain them during these tough stressed times so this gem from our library for u all! Ur fav couple #sakshitanwar n @iamramkapoor r back from tonight 9-10pm in#karletubhimohabat on tv! Enjoy n stay home n stay safe

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

\\

केहने को हमसफर है -

 

View this post on Instagram

 

#kehnekohumsafarhain asks uncomfortable questions on morality n marriage! Now on @zeetv from tonight-10.30 pm! Wat if u find ur soulmate after u get married ( now pls stay safe n enjoy relax n wish d Ppl not well get well soon)

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवल्यावर एकताने आपला मोर्चा चित्रपट आणि वेब सिरीजकडे वळवला होता. ALTBalaji या App वर एकताच्या सर्व वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. या App वरचा कंटेंट पाहण्यासाठी आपल्याला मासिक वर्गणी भरणे गरजेचे आहे. मात्र आता कोरोना व्हायरसमुळे या App वरील काही गाजलेल्या वेब सिरीज प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहेत. यामध्ये राम कपूर व साक्षी तन्वर यांची 'कर ले तू भी मोहब्बत' ही रात्री 9 वाजता, शर्मन जोशीची ‘बारिश’ रात्री 10 वाजता, तर गुरदीप कोहलीची ‘केहने को हमसफर है’ रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. (हेही वाचा: Coronavirus मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतही 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांची सरकारकडे अजब मागणी)

बारिश -

 

View this post on Instagram

 

....( maybe not) ! Ths show was probably more for tv than web ..I thought ...gave it a v low promotional launch ! Thought it would b a nice one to round up the library..!not only did it do exceptionally well it opened up smaller towns n new audiences for us! #baarish worked for its simplicity n sweetness! @altbalaji @mehranandita @priyabanerjee @ashanegi @sharmanjoshi @baljitsinghchaddha

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor) on

या तीनही वेबसिरीज झी टीव्हीवर प्रसारित होणार आहेत. ALTBalaji वर जेव्हा या सिरीज आल्या होत्या तेव्हा अतिशय कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. त्यानंतर अनेकदा या सिरीज टीव्हीवर कधी येणार अशी विचारणा होत होती. आता या लॉक डाऊनमुळे प्रेक्षकांना या वेब सिरीज पाहता येणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now