Colors Channel Apologized: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान; शिवसेना, मनसेच्या इशाऱ्यानंतर कलर्स टीव्हीकडून माफीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
त्यानंतर कलर्सने माफी मागणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. वायकॉमच्या लेटरपॅडवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.
बिग बॉस 14 ( Bigg Bos 14) या कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) यांने मराठी भाषेचा अवमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर कलर्स टाव्ही (Colors TV Apologizes) या वाहीनीने पत्र लिहून माफी मागितली आहे. कलर्सने माफी मागणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. वायकॉमच्या लेटरपॅडवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.
काय आहे प्रकरण?
बिग बॉस 14 च्या पर्वामद्ये गायक राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, निक्की तांबोली ही राहुल वैद्य आणि जान सानू यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी , ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे उद्गार जान सानू याने काढले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. (हेही वाचा, Bigg Boss 14: मराठी विरोधी वक्तव्यामुळे बिग बॉस स्पर्धक जान कुमार सानू वादात; शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा)
शिवसेना, मनसे आक्रमक
जान कुमार सानू याने केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले होते. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जान कुमार सानू याला इशारा देत 'मुंबईत करीअर कसे करतो हेच पाहतो. आम्ही मराठी लवकरच तुला थोबाडणार' असे म्हटले होते. तर, शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनीही 'मराठी भाषेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले होते.' दरम्यान, अभिनेते आदेश बांदेकर यांनीही कारवाईची मागणी केली होती. (हेही वाचा, Bigg Boss 14: 'आम्ही मराठी तुला लवकरच तुला थोबडवणार', मनसे नेते अमेय खोपकर यांचा बिगबॉस स्पर्धकाला इशारा)
'मराठी भाषेचा अनादर खपवून घेणार नाही'
शिवसेना खासदार प्रताप सरकनाईक यांनी आपल्या ट्विटमध्ये इशारा देत म्हटले होते की, 'Big Boss मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते, मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानुचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही'.
'आम्ही मराठी तुला थोबडवणार'
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.
दरम्यान, दरम्यान, शिवसेना खासदार प्रताप सरनाईक आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिलेल्या इशारा आणि ट्विटनंतर कलर्स वाहिनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. परंतू, हा वाद वाढतो आहे असे लक्षात येताच कलर्सने वेळीच आवरते घेत माफी मागितली आहे. कंगना रानौत या अभिनेत्रीने नुकतीच मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त कश्मीर असा काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यामुळे तापलेले वातावरण अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर परप्रांतीय लोकांकडून मुंबई आणि मराठी भाषा यांचा अवमान होत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.