Bigg Boss Season 13: बिग बॉसचे घर यंदा लोणावळा येथे नव्हे तर मुंबईत उभारणार?
कलर्स चॅनलवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळख असणाऱ्या बिग बॉसचा सीझन 13 (Bigg Boss Season 13) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर यंदासुद्धा सलमान खान (Salman Khan) या शोसाठी सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कलर्स चॅनलवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळख असणाऱ्या बिग बॉसचा सीझन 13 (Bigg Boss Season 13) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर यंदासुद्धा सलमान खान (Salman Khan) या शोसाठी सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना बिग बॉस कधी सुरु होते आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चंकी पांडे (Chunky Pandey) हे घरातील सदस्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.परंतु या वर्षी बिग बॉसचे घर लोणावळा (Lonavla) नव्हे तर मुंबईतील(Mumbai) गोरेगाव येथे उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गोरेगाव येथे बिग बॉसचे घर उभारण्यामागे काही कारणे असल्याचे ही म्हटले जात आहे. त्यामधील मुख्य कारण म्हणजे बिग बॉसचे घर उभारण्यासाठी कमी खर्च करायचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत बिग बॉसचे शुटिंग मुंबईत होणार असून क्रू मेंबर्ससाठी घर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी निर्मात्यावर नसणार आहे.(Bigg Boss 13: बिग बॉस 13 पर्वासाठी सलमान खान किती मानधन घेणार? नवा आकडा घ्या जाणून)
तसेच लोणावळा येथे येण्याजाण्यासाठी खर्च अधिक होत असल्याचे ही म्हटले गेले आहे. राहता प्रश्न सलमान खान याचा तर बिग बॉसच्या शुटिंगसाठीचा तर मुंबईतील ठिकाण सोईस्कर असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शो मध्ये बड्या दिग्गजांची वर्णी लागणार असल्याची बोलले जात आहे. तर मुग्धा गोडसे, रश्मि देसाई, आदित्य नारायण आणि मिहिका शर्मा यांची नावे स्पर्धक म्हणून चर्चेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2019 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

