Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस विजेत्यासाठी सु्प्रिया सुळेंची खास पोस्ट, केदार शिंदे काढणार सुरजच्या जीवनावर चित्रपट

सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा रितेश देशमुखने केली, तो व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी आपली पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस विजेत्यासाठी सु्प्रिया सुळेंची खास पोस्ट, केदार शिंदे काढणार सुरजच्या जीवनावर चित्रपट

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan:  ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला गेला. बारामचीचा सोशल मि़डीयास्टार सुरज चव्हाण हा या पर्वाचा विजेता ठरला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याने 70  दिवसांच्या प्रवासानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं. त्याने हा शो जिंकताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अनेक सेलिब्रिटीनी त्याच्यासाठी पोस्ट केल्या असून कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा या ग्रँड फिनालेमध्ये केली आहे.  (हेही वाचा -  Bigg Boss Marathi Season 5 Winner: बारामतीचा सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता, अभिजीत सावंत ठरला रनरअप )

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकर असलेल्या केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की "कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो."

सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा रितेश देशमुखने केली, तो व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी आपली पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 11:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).