Bigg Boss Marathi 5 Top 6 Finalist: बिग बॉस मराठी 5 मधील टॉप फायनालिस्ट; कोणाचा थांबला थोडक्यात प्रवास? घ्या जाणून

सूरज चव्हाण (Suraj Chavan), अभिजित सावंत (Abhijit Sawant), जानव्ही किलेकर, निकी तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता प्रभू वालावरकर यांच्यात ट्रॉफीसाठी स्पर्धा आहे.

Bigg Boss Marathi 5 Top 6 Finalist | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5) अवघ्या काही तासातच आपला फिनाले साजरा करतो आहे. त्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले असून, चाहत्यांना मतदानासाठी वोटींग लाईनही सुरु झाल्या. याशिवाय आजच्या भागात (3 ऑक्टोबर) बिगबॉसने आपले अंतिम 6 फायनालिस्ट जाहीर केले. अर्थात हा निर्णय साधा नव्हता. त्यासाठी घरात राहिलेल्या 7 सदस्यांपैकी एकाला घरातून बाहेर पडावे लागले. हा सदस्य म्हणजे मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री वर्षा उसगांवकर. त्या घराबाहेर झाल्याने आता घरात केवळ 6 सदस्य राहिले आहेत. ज्यांची नावे आहेत

वर्षा उसगांवकर यांच्या जाण्याने चाहत्यांना धक्का

मराठी बिग बॉस 5 घर म्हणजे अनिश्चिततेचे ठिकाण. त्यामुळे केव्हा काय परिस्थिती निर्माण होईल आणि एखाद्या स्पर्धकाला घराबाहेर जावे लागेल हे सांगता येत नाही. आजही तसेच झाले. बिग बॉसने आपल्या खास सवयी प्रमाणे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि एका सदस्याला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. वर्षा उसगांवकर यांच्या रुपात हा सदस्य घरातून बाहेर पडला. त्यांच्या जाण्याने बिग बॉसच्या आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. खरे तर शेवटचा सामना अंकिता वालावरकर आणि वर्षा यांच्यात झाला. एकूण या हंगामातील कामगिरी पाहिली तर अनेकांना असे वाटत होते की, अंकिता घरातून बाहेर पडेल. पण झाले उलटेच.. शेवटच्या क्षणी बिग बॉसने वर्षा यांचे नाव जाहीर केले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 5 Finale Week: बिग बॉस मराठी 5 हंगामाचा 10 वा आठवडा; फिनालेपूर्वी दुसऱ्या क्रमांकावर कोण?)

जान्हवी किलेदारला फुटले रडू

दरम्यान, वर्षा उसगावकर यांच्या जाण्याने घरातील काही स्पर्धकांनाही धक्का बसला. ज्यामध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किलेदार, सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. दरम्यान, धनंजय पोवार आणि अभिजित सावंत यांनीही नाही म्हणायला वर्षा घारबाहेर गेल्याने दु:ख व्यक्त केले. अंकिता प्रभू वालावरकर मात्र अंतिम सहा फायनलिस्टमध्ये सहभाग मिळाल्याबद्दल आनंदी होत्या.

ट्रॉफी जिंकणार कोण?

बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याच्या प्रक्रियेसाठी फिनाले काऊंटडाऊन सुरु झाले आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला उत्कंटा वाढत आहे. अशा वेळी सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत हे दोन स्पर्धक तगडे दावेदार समजले जात आहेत. असे असले तरी, जान्हवी किलेदार आणि निक्की तांबोळीही या स्पर्धेत भक्कम आहेत. उर्वरीत धनंजय पोवार आणि अंकिता वालावरकर यांच्यामध्ये घराबाहेर आगोदर कोण पडते यामध्येच स्पर्धा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif