Bigg Boss Marathi 5 Grand Finale Date: बिग बॉस मराठी सीझन 5 चा अंतिम सोहळा रंगणार 6 ऑक्टोबरला

बिग बॉस मराठी 5 चा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये आला असल्याने यामध्ये शेवटच्या टप्य्यात आता क्षणोक्षणी ट्विस्ट अपेक्षित आहेत.

Bigg Boss Marathi 5 | Instagram

बिग बॉस मराठी सीझन 5 (Bigg Boss Marathi 5) यंदा 100 ऐवजी 70 दिवसांतच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. या सीझन मध्ये केवळ संग्राम चौघुले वाईल्ड कार्ड म्हणून घरात आला पण तो देखील दुखापतीमुळे बाहेर पडला. आता महाअंतिम सोहळा (Bigg Boss Marathi 5 Grand Finale) 6 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. बिग बॉसने यंदाचा सीझन ब्लॉकबस्टर ठरला असला तरीही तो लवकर निरोप घेणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आठवड्यामध्ये पंढरीनाथ कांबळी यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे तर निक्की तांबोळी ने थेट अंतिम फेरीमध्ये तिकीट टू फिनाले मिळवत प्रवेश केला आहे. आता विजेतेपदावर कोण नाव कोरणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.  नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5: संग्रामनंतर अरबाज पटेल बिग बॉसच्या घराबाहेर; निक्कीला अश्रू अनावर .

बिग बॉस मराठी सीझन 5 चा महाअंतिम सोहळा

बिग बॉस मराठी सीझन 5 चा अंतिम सोहळा 30 दिवस लवकर म्हणजे 6 ऑक्टोबरला रंगणार आहे. खुद्द बिग बॉसनेच या ट्वीस्टची माहिती दिली आहे. सध्या खेळ अंतिम टप्प्यात म्हणजे  अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजित सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये रंगत आहे.

हिंदी आणि मराठी बिग बॉसची टक्कर 6 ऑक्टोबरला

मराठी बिग बॉस निरोप घेण्याची आणि हिंदी बिग बॉसच्या सुरूवात यांची टक्कर होणार आहे. 6 ऑक्टोबरला एकीकडे मराठी बिग बॉसचा महाअंतिम सोहळा रंगत आहे तर त्याच दिवशी सलमान खान हिंदी बिग बॉस सीझन 18 देखील सुरू होत आहे. सलमान खानच्या पहिल्या प्रोमो मध्ये 'अब होगा टाईम का तांडव' म्हणत त्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस मराठी 5 चा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये आला असल्याने यामध्ये शेवटच्या टप्य्यात आता क्षणोक्षणी ट्विस्ट अपेक्षित आहेत.  घरातील सदस्यांना अंतिम फेरीत गाठण्याकरिता नव्या आणि अधिक कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अंतिम फेरीपर्यंत बाजी मारेल अशी आशा असलेला  अरबाझ पटेल खेळातून बाहेर पडल्याने एकटी पडलेली निक्की कसं निभावून नेणार याची चर्चा होती पण आता ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली आहे. टीम बी मध्ये देखील आव्हानांचा मुकाबला करत एकजूट टिकवणं त्यांना कठीण जात असल्याचं दिसत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif