Bigg Boss Marathi 5: निक्की तांबोळी ने दिला अभिजित सावंतला खास सल्ला

यामध्ये तू देखील आपल्यातल्या गोष्टी ग्रुपला जाऊन सांगू नकोस असं म्हटलं आहे. माझ्यासाठी कॅप्टन महत्त्वाचा असल्याचं निक्की म्हणाली आहे.

BBM5 | X

बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5) च्या घरात जसा खेळ पुढे जात आहे तशी स्पर्धकांमधील समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. आता बिग बॉस मराठी च्या घरात मागील आठवड्यात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ग्रुप ए मधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant)  सोबत मैत्री करताना दिसत आहे. या आठवड्याच्या जोडी टास्क मध्येही त्या दोघांची जोडी आहे. अशावेळी दोघं सातत्याने एकत्र असताना निक्कीने अभिजीतला एक सल्ला दिल्याचं एक्स्ट्रा कल्लामध्ये मध्ये दिसलं आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील खास गप्पा गोष्टी, मज्जा मस्ती या जिओ सिनेमावरील एक्स्ट्रा कल्लामध्ये पाहायला मिळतात. त्याच्या एका क्लिप मध्ये निक्कीने अभिजीतला दिलेला सल्ला पहायला मिळत आहे.

निक्कीने काय दिला अभिजितला सल्ला ?

निक्की तांबोळी ही यापूर्वी हिंदी बिग बॉस मध्येही झळकली आहे. तिच्या हिंदी बॉस मधील काही गोष्टी सांगताना तिने गौतम गुलाटी चा उल्लेख करत त्याच्या सीझन मध्येही घरातील सदस्य त्याच्या विरूद्ध होते पण अखेर गौतमने विजेते पद जिंकलं. 'निसर्गाची एक पॉलसी आहे. जंगलचा राजा एक असतो बाकी प्राणी केवळ सोबत असतात. ते राजा समोर एकटे जाऊ शकत नाहीत.' असे निक्की म्हणाली आहे.

निक्की ने अभिजितला आपण तुला मित्र म्हणू काही गोष्टी सांगत असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये तू देखील आपल्यातल्या गोष्टी ग्रुपला जाऊन सांगू नकोस असं म्हटलं आहे. माझ्यासाठी कॅप्टन महत्त्वाचा असल्याचं निक्की म्हणाली आहे. Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 ने तोडले रेटिंगचे सर्व रेकॉर्ड; 3.9 TVR प्राप्त करून ठरला नंबर एकचा नॉन फिक्शन शो .

दरम्यान निक्कीचा अरेरावी अंंदाज घरात सगळ्यांनाच खटकला आहे. येता-जाता तिचे घरातील सदस्यांसोबत खटके उडताना दिसत आहेत.  मागील आठवड्यात 'भाऊच्या धक्क्या'वर देखील 'चुगली' ऐकून निक्कीने ग्रुप ए मधून मी कोणाला विजेते पदाची ट्रॉफी उचलायला देणार नसल्याचं म्हटलं आहे. मी नाही तर ग्रुप बी मधलं कोणीही विजेतं झालेलं मला चालेल असं ती म्हणाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif