Bigg Boss Marathi 2, Episode 83 Preview: ब्रेकिंग न्यूज टास्कदरम्यान अभिजित बिचुकले यांच्या वक्तव्यामुळे घरात होणार राडा

या टास्कमुळे घरातील सदस्यांमध्ये उत्सुकता तर आहेच. मात्र नेहमीप्रमाणेच या टास्कला सुद्धा वादाचे वळण लागताना दिसून येणार आहे.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात आज ब्रेकिंग न्यूजचा (Breaking News) टास्क रंगणार आहे. या टास्कमुळे घरातील सदस्यांमध्ये उत्सुकता तर आहेच. मात्र नेहमीप्रमाणेच या टास्कला सुद्धा वादाचे वळण लागताना दिसून येणार आहे. घरात पाहुणे म्हणून एन्ट्री केलेल्या अभिजित बिचुकले यांच्या येण्याने घरातील वातावरण जरी खेळीमेळीचे झाले आहे. तरीही त्यांचा राग मात्र आवरला जात नाही आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजच्या टास्कदरम्यान बिचुकले यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे घरात राडा होणार आहे.

बिचुकले हे या टास्कमध्ये रिपोर्टरची भुमिका साकारत आहेत. तर किशोरी यांनी शिवानी आणि आरोह यांनी लग्न केले आहे असा प्रश्न केला असता बिचुकले यांनी यावर रिपोर्टिंग करण्यास सुरुवात करतात. रिपोर्टिंग करत असताना बिचुकले यांनी हे खरे प्रेमप्रकरण होत की नाटक असा सवाल उपस्थित करतात. यावर वीणाला राग येत ती बिचुकले वैयक्तिकरित्या एखाद्याला बोलत असल्याचे मत व्यक्त करते.यानंतर बिचुकले आणि शिवमध्ये वाद होताना आजच्या एपिसोड मध्ये दिसून येणार आहे. तर या वादाचा शेवट नेमका काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(Bigg Boss Marathi 2, August 15, Episode 82 Update: बिग बॉसच्या घरात मेघा आणि रेशम यांच्यामध्ये रंगला पाकस्पर्धेचा टास्क; सुशांत आणि त्याची टीम ठरले साप्ताहिक कार्यात विजयी)

तसेच टास्कदरम्यान ऐन सणासुदीच्या दिवशी शिवानीला अचानक चक्कर येत तातडीची वैद्यकिय गरज भासणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.मात्र शिवानीला आलेली चक्कर ही तिला असणाऱ्या वैयक्तिक आजारामुळे आली हे की यापाठी आणखी कोणते दुसरे कारण आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आजचा बिग बॉसचा एपिसोड नक्की पाहा.



संबंधित बातम्या

Superstition: पितृत्व प्राप्त करण्यासाठी जिवंत कोंबडीचे पिल्लू गिळले, तरूणाचा मृत्यू; छत्तीसगडमधून अंधश्रद्धेची धक्कादायक घटना समोर

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील