Bigg Boss Marathi 2 Episode 54 Preview: 'मर्डर मिस्ट्री' टास्क दरम्यान हीना, माधव आणि रुपाली मध्ये जुंपणार
बिग बॉस मराठी 2 च्या घरात मर्डर मिस्ट्री टास्क दरम्यान खुनी असलेल्या शिवानी सुर्वेच्या आव्हानामुळे अनेकांवर रडायची वेळ येणार आहे की सांकेतिक खून पाडता पाडता तिच्याच नाकी नऊ येणार आहे हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरात सध्या 'मर्डर मिस्ट्री' हे कार्य सुरू आहे. पुढील कॅप्टन निवडीच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेले हे कार्य इंटरेस्टिंग आहे. या टास्कच्या पहिल्या दिवशी घरात किशोरी शहाणेंचा (Kishori Shahane) सांकेतिक खून करण्यामध्ये शिव यशस्वी ठरला आहे. आता घरात कोणाकोणाचा आणि कसा खून पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. खुनींना त्याची ओळख लपवत हे कार्य पार पाडायचं आहे. त्यामुळे कायम घरातील सदस्यांची एकमेकांवर संशयाची सुई राहणार आहे. निम्म्याहून अधिक दिवसांचा प्रवास करून पुढे आलेले सदस्य सध्या पुन्हा दोन गटात विभागले आहेत. पहा आजच्या भागामध्ये काय घडणार आहे?
आजच्या बिग बॉस मराठी 2 च्या प्रोमो मध्ये टास्क दरम्यान हीना आणि माधव मध्ये बाचाबाची झाली आहे. मागील काही दिवसांपासून हीना, माधव आणि नेहा हे त्रिकुट मोडलं आहे. शिवानीच्या येण्यामुळे माधव आणि नेहा हे दोघं हीनापासून दुरावले आहेत. असा तिचा आरोप आहे. याच समज-गैर समजामधून हा वाद रंगला आहे की मर्डर मिस्ट्री दरम्यान टास्कचा एक भाग आहे. हे आजच्या भागामध्ये उलगडणार आहे.
बिग बॉस मराठी प्रोमो
नक्की कोणत्या मुद्द्यावरून झालाय हीना आणि रुपालीमध्ये वाद? पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @maadhavdeochake @bhosle_rupali @GmKishori @TheHeenaPanchal @officialveenie @abhijeetkellkar @ShivThakr @imsurveshivani @vaishalimhade @manjrekarmahesh pic.twitter.com/y9r3VmHIss
— Bigg Boss Marathi 2 (@BiggBossMarathi) July 18, 2019
सध्या रूपाली भोसले घराची नवी कॅप्टन आहे. 'मर्डर मिस्ट्री' या टास्कमध्ये अभिजीत केळकर एका सिक्रेट रूम मध्ये आहे. तेथून तो खुनींना दिशा देत आहे. आता बिग बॉसच्या घरात शिवानी गेस्ट म्हणून आली आहे. तिची घरातली भूमिका किती निर्णायक ठरणार आहे हेदेखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2019 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

