Bigg Boss Marathi 2 Day 4 Episode Preview: बिग बॉसच्या घरात दिगंबर नाईक चं मालवणी गार्हाणं (Watch Video)
बिग बॉसच्या घरात वादानंतर वातावरण थोडं हलकं करण्यासाठी दिगंबर नाईकने मालवणी अंदाजात खास गार्हाण घातलं आहे.
बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरात पहिल्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. टीम वैशाली आणि टीम अभिजित बिचुकले यांच्या संघांमध्ये जोडी जोडीने खेळाला सुरूवात झाली आहे. आवडत्या एका वस्तूचा त्याग करून किंवा बिग बॉसच्या घरातील सदस्याचा विक पॉंईट हेरून टास्क दिलं आहे. आज बिग बॉसच्या घरात वीणा जामकर आणि नेहा शितोळेला गळ्यात पाटी आणि कपाळावर 'अपात्र' असं लिहून घरात फिरायचं आहे. या बदल्यात त्यांच्या टीममधील दोन व्यक्ती नॉमिनेशनपासून बचावणार आहेत. मात्र एकमेकांना वाचवण्याच्या या खेळामध्ये बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये भावनिक चढ उतार पहायला मिळत आहेत.
आज या खेळामध्ये वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांच्यामध्येही आज जेवणावरून वाद झाले आहेत. पहा आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरात काय काय झालंय?
बिग बॉसच्या घरात वादानंतर वातावरण थोडं हलकं करण्यासाठी दिगंबर नाईकने मालवणी अंदाजात खास गार्हाण घातलं आहे. बिग बॉसच्या घरातलं पहिल्या आठवड्यात रसिकांमध्ये शिवानी सुर्वे- अभिजीत बिचुकले यांच्यामधील नोकझोक, पडद्यावरील 'खलनायक' विद्याधर जोशींचा हजरजबाबी आणि ह्युमरस अंदाज पहायला आवडत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये पसरत आहे.