Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Preview नॉमिनेशनपासून बचावण्यासाठी बिग बॉसच्या घरात आज 'इमोशन्स'चा खेळ

यंदा बिग बॉसच्या घरात 15 सेलिब्रिटी स्पर्धकांचा समावेश झाला आहे.

BBM2 (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 3 Episode Sneak Peek: बिग बॉस मराठी 2 चा खेळ 26 मे पासून सुरू झाला आहे. यंदा बिग बॉसच्या घरात 15 सेलिब्रिटी स्पर्धकांचा समावेश झाला आहे. आता पहिल्या आठड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी घरातील सदस्यांमध्ये खेळाला सुरूवात झाली आहे. आजच्या भागात नॉमिनेशनपासून बचावण्यासाठी टीम वैशाली (Team Vaishali) आणि टीम अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांच्यामध्ये खेळ रंगणार आहे.

Colors Marathi Tweet 

100 दिवसांच्या खेळामध्ये आता आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचं आव्हान प्रत्येकासमोर असणार आहे. आज पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनपासून बचावण्यासाठी सदस्यांना आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे. मैथिली जावकरला वाचवण्यासाठी रूपालीला बिग बॉसकडून मिळालेला तिचा खास 'भिडू' सॉफ्ट टॉयचा त्याग करावा लागणार आहे तर अभिजीतला त्याच्या फॅमिलीचा फोटो नष्ट करावा लागणारा आहे.

घरापासून, अनेक सुख सोयींपासून दूर बिग बॉसच्या घरात कैद व्यक्तींना त्यांच्या जवळच्या काही खास गोष्टींचा आधार असतो मात्र आता त्याच वस्तू बिग बॉसने हिरावून घेतल्याने आता या स्पर्धकांची इमोशनल कसोटी लागणार आहे.

यंदाच्या आठवड्यात नशीबाचा कौल मिळाल्याने वैशाली माडे, अभिजित बिचुकले, माधव देवचक्के, दिगंबर नाईक हे स्पर्धक सुरक्षित आहेत. आता कोण कोण सुरक्षित होतंय आणि कोण नॉमिनेट? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.