Bigg Boss Marathi 2: बिग बॉस घरात हाणामारी; शिवानी सुर्वे, वीणा जगताप खेळातून बाद होण्याचे संकेत
यहा कल क्या होगा किसने जाना..' असे म्हटले जाते की, बिग बॉस हा नेहमी सकाळी जे गाणे लावतो. त्या गाण्याचा विशिष्ट असा अर्थ असतो. ते प्रचंड विचारपूर्वक लावतो. 11 व्या दिवशी लावलेलं गाणंही असाच संदेश देणारा वाटतो. या गाण्याचा विणा आणि शिवाणी यांच्यापूरता मर्यादीत अर्थ लावायचा तर, या दोघींची खेळातून हकालपट्टी होऊ शकते.
Bigg Boss Marathi 2, 6th June 2019, Day 11 Episode Updates: चोर बाजार टास्कमध्ये आज पुन्हा एकदा स्पर्धकांमध्ये वादावादीचे प्रकार पाहायला मिळाले. त्यात शिवानी सुर्वे आणि किशोरी शाहाणे विज यांच्यातील शाब्दीक वाद. तर, वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांच्यातील हातापाई चर्चेचा विषय ठरावी अशी होती. चोर बाजार या टास्कमध्ये खेळताना वीणा ही चोर होती तर शिवानी पोलीस. चोर (वीणा) पकडून नेताना पोलीसाने (शिवानी) बळाचा वापर केला. शिवानीची पद्धत न पटल्याने विणाने शिवानीला हाताने झटकण्याचा प्रयत्न केला. या वेळी शिवानी सुर्वे हिने विणाला लाथ मारली. बिग बॉसने या प्रकाराची गंभीर नोंद घेतलेली दिसते. तसेच, दोघींना खेळातून बाद करण्याचे संकेतही मिळत आहेत.
बिग बॉसने दिला संदेश
बिग बॉसच्या घरातील 11 वा दिवस 'जिंदगी एक सफर हैं सुहाना.... यहा कल क्या होगा किसने जाना..' असे म्हटले जाते की, बिग बॉस हा नेहमी सकाळी जे गाणे लावतो. त्या गाण्याचा विशिष्ट असा अर्थ असतो. ते प्रचंड विचारपूर्वक लावतो. 11 व्या दिवशी लावलेलं गाणंही असाच संदेश देणारा वाटतो. या गाण्याचा विणा आणि शिवानी यांच्यापूरता अर्थ लावायचा तर, या दोघींची विकेट पडू शकते.
किशोरी शहाणे ही बिग बॉस घरातील नागिण: शिवानी सुर्वे
किशोरी शहाणे यांना उचकविण्यासाठी आणि एक स्ट्रॅटीजीचा भाग म्हणून जरी योग्य असला तरी, शिवानी सुर्वे यांची देहबोली आणि वापरलेली भाषा ही पूर्णपणे उद्धट वाटावी अशा पद्धतीची वाटत होती. दरम्यान, किशोरी शहाणे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वयाचे विचार कर असा सल्ला अभिजित बिचुकले यांनी शिवानीला दिला. पण, किशोरी शहाणे असतील तर, त्यांच्या घरात. ती बिग बॉसच्या घरातील नागिण आहे, असे उद्गार शिवानी हिने काढले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले कधी नव्हे ते भडकले, ओली चड्डी घेऊन घरभर फिरले)
चोरबाजार टास्कमध्ये पराग कान्हेरे वरचढ
बिग बॉसच्या घरात बिग बॉसने दिलेल चोर बाजार हा टास्क कोणाला कळला असेल तर, तो पराग कान्हेरे यांना. खऱ्या अर्थाने पराग यांनी काल आणि आज या टास्कला मजा आणिली. दुकानदार म्हणून वस्तू विकत घेताना आणि वस्तू विकतानाही खरा सेल्समन पराग कान्हेरे यांनी दाखवून दिला.