Bigg Boss 15: 'बिग बॉस' अडकला कोरोनाच्या विळख्यात; शोला आवाज देणारे Atul Kapoor यांना Covid-19 चा संसर्ग, सेटवरील अनेक लोक क्वारंटाईन- Reports
बिग बॉसबद्दल सांगायचे तर, काही दिवसांपूर्वी देवोलीनाची तब्येत बिघडली होती, तेव्हा खबरदारी म्हणून बिग बॉसच्या घरात गेलेल्या सर्व स्पर्धकांचीही चाचणी घेण्यात आली.
कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या मुंबईच्या सेटवर कोरोनाचा हाहाकार माजला आहे. बिग बॉसशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या प्रसिद्ध इंस्टाग्राम हँडलने आपल्या अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार बिग बॉसचा आवाज असणारे डबिंग कलाकार अतुल कपूर (Atul Kapoor) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सेटवर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाइन करण्यासोबतच या सर्वांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे.
अतुल कपूरसोबत अजून एक डबिंग कलाकार बिग बॉसला आपला आवाज देतो. विजय विक्रम सिंग असे त्याचे नाव आहे. आता अतुलच्या अनुपस्थिती शोची जबाबदारी विजयच्या खांद्यावर येईल असे दिसते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु आता काही दिवस प्रेक्षकांना बिग बॉसचा दमदार आवाज कमी ऐकायला मिळणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. सध्या मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिग बॉस 15 चे शूटिंग सुरू आहे.
फिल्मसिटीमध्ये शूट होत असलेल्या इतर मालिका आणि रिअॅलिटी शोच्या सेटवरही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. बिग बॉसबद्दल सांगायचे तर, काही दिवसांपूर्वी देवोलीनाची तब्येत बिघडली होती, तेव्हा खबरदारी म्हणून बिग बॉसच्या घरात गेलेल्या सर्व स्पर्धकांचीही चाचणी घेण्यात आली आणि त्यांचे निकाल निगेटिव्ह आले. (हेही वाचा: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री kishwer Merchantt च्या 4 महिन्यांच्या मुलाला Covid-19 ची लागण)
देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना महामारीमुळे बिग बॉस 15 चा हा सीझन पुन्हा एकदा 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. मिथुन चक्रवर्तीचा हुनरबाज आणि झैन इमामचा ‘फना इश्क में परजावां’ हे आगामी आठवड्यात बिग बॉसची जागा घेणार होते. परंतु आता वाहिनीला कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आगामी शोचे प्रमोशन करण्यासाठी समस्या उद्भवत आहेत. त्यामुळेच चॅनलने सध्या सुरू असलेले त्यांचे शो अजून काही दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.