कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराने हाहाकार माजवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडसह अनेक टीव्ही स्टार्स या व्हायरसच्या विळख्यात आले आहेत. इतकेच नाही तर अनेक टीव्ही स्टार्सच्या मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्या 4 महिन्यांचा मुलगा निरवैरला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. खुद्द किश्वर मर्चंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. किश्वरच्या घरात तिच्या मुलासह 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)