Bigg Boss 15 Audition: बिग बॉस 15 मध्ये सहभागी होण्याची संधी, सुरु झाल्या ऑडिशन; जाणून घ्या कुठे पोस्ट कराल तुमचा व्हिडीओ व नियम

या रिअॅलिटी शोचा 15 वा सीझन लवकरच परत येईल आणि त्यासाठी व्हूट सिलेक्टवर ऑडिशनही (Bigg Boss 15 Audition) सुरू झाल्या आहेत.

A still of Salman Khan from the sets of Bigg Boss. (Photo Credits: File Photo)

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रियलिटी शो 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) ला रुबीना दिलैकच्या रूपाने त्याचा विजेता मिळाला आहे. या हंगामामध्ये राहुल वैद्य उपविजेता ठरला. आता या शोचे चाहते बिग बॉसच्या 15 व्या (Bigg Boss 15) सीझनची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, बिग बॉस 14 संपल्यानंतर शोचा होस्ट सलमान खानने आगामी सीझनबद्दल काही खास माहिती शेअर केली आहे. 'बिग बॉस 14' संपल्यामुळे निराश झालेल्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी चांगली बातमी आहे. या रिअॅलिटी शोचा 15 वा सीझन लवकरच परत येईल आणि त्यासाठी व्हूट सिलेक्टवर ऑडिशनही (Bigg Boss 15 Audition) सुरू झाल्या आहेत.

म्हणजेच आता बिग बॉस 15 मध्ये सर्वसामान्य लोक सहभागी होऊ शकणार आहेत. जर तुम्हाला पुढच्या बिग बॉसमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ऑडिशनचा व्हिडीओ पाठवावा लागणार आहे. व्हूट अ‍ॅपवर 'FIRST TIME EVER' नावाचा टॅब आहे, जिथे BB15 साठी ऑडिशन व्हिडिओ मागितले जात आहे. सध्या फक्त व्हूट सदस्यच हे व्हिडीओ पाठवू शकतात.

या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये 'बिग बॉस 15' साठी प्रथम नोंदणी करावी लागेल. आपले नाव, मोबाइल नंबर, ईमेल यासारखी माहिती नोंदणी फॉर्ममध्ये द्यावी लागेल आणि आपला व्हिडिओ रेकॉर्ड करुन अपलोड करावा लागेल. रेकॉर्ड करण्यासाठी, त्याच फॉर्मच्या खाली एक बटण दिले आहे. ऑडिशन देणाऱ्या सहभागींना आपण मतदानही करू शकाल. तुम्ही www.voot.com या वेबसाईटवरही नोंदणी करू शकता. यासाठी तुमचे वाय 18 पेक्षा जास्त व तुम्ही भारतीय असणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Kapil Sharma याला झालंय तरी काय? व्हीलचेअरमध्ये बसून विमानतळावरुन बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद; चाहत्यांनाही बसला धक्का (पाहा Video)

तुमचा व्हिडीओ जास्तीत जास्त 50 एमबी व पाच मिनिटांपेक्षा कमी असावा. तो avi, mov, mp4 किंवा अन्य नियमित व्हिडिओ स्वरूपांमध्ये असावा. ऑडिशन्स पूर्ण होईपर्यंत आपण इतर कोणताही प्रोग्राम्स, रिअॅलिटी शो किंवा सिरीयलवर दिसू शकत नाही. निर्माते सर्वोत्कृष्ट ऑडिशन व्हिडिओ निवडतील, जे व्हूट सिलेक्ट अॅपवर मत देण्यासाठी ठेवले जातील. जास्तीत जास्त मते मिळविणार्‍या व्हिडिओंना बिग बॉस 15 च्या ऑडिशनच्या पुढील फेरीत जाण्याची संधी मिळेल. बिग बॉस 15 ऑडिशन 22 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान लाइव्ह असेल.