Bigg Boss 15; अभिजित बिचुकले बिग बॉस 15 मधून बाहेर; पत्रकार परिषद घेऊन करणारा मोठे खुलासे
ज्यांनी महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. मात्र, या निवडणुकीत अनेकवेळा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे
टीव्हीवरील एक वादग्रस्त शो 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे शोमधील फिनाले टास्कचे तिकीट कुटुंबातील सदस्यांसाठी खूप महत्त्वाचे बनले होते. याच कारणावरून टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार चढाओढ दिसली. आता माहिती मिळत आहे की, या शो मधील मराठी स्पर्धक अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) आता बिग बॉस 15 च्या घरातून बाहेर पडले आहेत. अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून अभिजित बिचुकले यांनी यंदाचे पर्व गाजवले.
शो मधून बाहेर पडल्यावर माध्यमांशी संवाद साधताना, ‘सलमान खान (salman khan) स्वत: ला काय समजतो? त्याला दाखवून देईल मी काय आहे’, असे वक्तव्य बिचुकले यांनी केले आहे. अभिजित बिचुकले हे मराठी बिग बॉस 2 मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांचे घरातील अनेक सदस्यांसोबत खटले उडाले होते. त्यानंतर हिंदी बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये त्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.
या शोमध्ये आपल्यापासून त्यांचे घरातील सदस्यांसोबत भांडण सुरु झाले. ‘बिग बॉस 15’ च्या घरात संस्कार थोडे कमी आहेत, असे त्यांचे मत होते व ते त्याबाबत आपली मते व्यक्त करत असत. यावरून रश्मी देसाई, देबोलीना, शमिता शेट्टी अशा घरातील अनेक महिला सदस्यांशी त्यांचे कधीच पटले नाही.
आता बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यावर बिचुकले म्हणाले, ‘फिनाले आता 1-2 दिवसांत होणार आहे त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही. परंतु एक दोन दिवसांत मी बोलेन. गेले अनेक आठवडे मी दुनियेपासून अलिप्त होतो. यादरम्यान बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडल्या, त्या बाहेर आल्या. आता एक-दोन दिवसात याबाबत मी पत्रकार परिषद घेऊन माझी सर्व मते, मुद्दे मांडणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘मी या शोमधून बाहेर निघणार होतो परंतु त्यांनी मला थांबण्याची विनंती केली. मला अशा शोची गरज नाही त्यांना आहे.’ (हेही वाचा: Main Chala Song Released: सलमान खान चे 'मैं चला' गाणे रिलीज, अवघ्या काही मिनिटांत मिळाले लाखो व्ह्यूज; Watch Video)
दरम्यान, महाराष्ट्रातील सातारा शहरात राहणारे अभिजित बिचुकले हे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते समजतात. ज्यांनी महापालिका ते संसदेपर्यंत निवडणूक लढवली आहे. मात्र, या निवडणुकीत अनेकवेळा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. काल सलमान खानच्या शोमध्ये खास पाहुणे म्हणून आलेले महेश मांजरेकर यांच्यासमोर अभिजीत यांनी आपण कलाकार, लेखक, कवी, गायक आणि निर्माता असल्याचे सांगितले.’