Bigg Boss 14 Grand Premiere Date: सलमान खानचा शो 'बिग बॉस 14' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज; जाणून घ्या ग्रँड प्रीमियरची तारीख आणि वेळ (Watch Video)
यंदाचे बिग बॉसचे 14 वे (Bigg Boss 14) पर्व असणार आहे. याआधी बिग बॉस 14 चे काही प्रोमोज समोर आले आहेत.
भारतामधील एक लोकप्रिय तितकाच वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉस (Bigg Boss) आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. यंदाचे बिग बॉसचे 14 वे (Bigg Boss 14) पर्व असणार आहे. याआधी बिग बॉस 14 चे काही प्रोमोज समोर आले आहेत. आता बिग बॉस 14 च्या प्रीमियरची तारीख आणि वेळ समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 14 चा प्रीमियर शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता होणार आहे. यंदाचा शो देखील अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे. ‘अब सीन पलटेगा’ असे म्हणत बिग बॉस 14 चा नवा प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये सलमान मास्क परिधान केलेला दिसत आहे. याआधी माहिती मिळत होती बिग बॉस 14, 4 ऑक्टोबर ला ऑन एयर होईल, मात्र आता तो 3 ऑक्टोबरला सुरु सुरु होत असल्याचे समजत आहे. सध्या चाहते ‘बिग बॉस 14 ची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. यंदाच्या सिझनमध्ये नक्की कोण कोण सामील होईल याबाबत वेगवेगळे अनुमान लावले जात आहेत. मात्र अजूनतरी ही गोष्ट पूर्णपणे गुलदस्त्यात आहे. बिग बॉसचा १३ वा सिझन अतिशय लोकप्रिय ठरला होता. यामुळेच हा शो 5 आठवड्यांसाठी वाढवण्यात आला होता. आता या शोमध्ये नवीन काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (हेही वाचा: Bigg Boss 14: सलमान खान व मेकर्सची बिग बॉस 14 साठी डील फायनल; तीन महिन्यासाठी तब्बल 450 कोटींना झाला व्यवहार- Reports)
पहा व्हिडिओ -
दरम्यान, सलमान खानने या शोचे 10 सीझन होस्ट केले आहेत व कदाचित ज्या पद्धतीने तो हा शो होस्ट करतो त्याची जागा इतर कोणी घेऊ शकणार नाही. सलमानचे होस्टिंग हे या शोच्या वाढत्या टीआरपीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. आता सलमान खानला यंदा प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल 20 कोटी मिळणार आहेत. सलमान खानची यंदाच्या सिझनची तीन महिन्यांची फी 480 कोटी आहे. परंतु एका स्रोताच्या मते, चॅनल आणि सलमानच्या टीमने 450 कोटींवर हा करार अंतिम केला.