BIGG BOSS 13 : बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी Salman Khan किती पैसे घेणार? रक्कम घ्या जाणून

मात्र, BIGG BOSS 13 साठी सलमान खान याने आपल्या मानधनात 100 कोटी रुपयांची वाढ केल्याचे समजते.

Bigg Boss 13, Salman Khan Fees | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Bigg Boss 13, Salman Khan Fees: कलर्स हिंदी वाहिनीवरील सर्वात वादग्रस्त, चर्चित आणि तितकाच लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो BIGG BOSS यंदा आपले 13 वे पर्व घेऊन येत आहे. सालाबादप्रमाणे याही वेळी हा शो अभिनेता सलमान खान (Salman Khan) हाच होस्ट करणार आहे. हा शो होस्ट करण्यासाठी Salman Khan याच्या मानधनाची रक्कमही प्रसारमाध्यमांतून जाहीर झाली आहे. सांगितले जात आहे की, BIGG BOSS 13 होस्ट करण्यासाठी Salman Khan याला मिळणारे मानधन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 100 कोटी रुपयांनी अधिक असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून BIGG BOSS 13 बद्दल सातत्याने नवनवे अपडेट्स येत आहेत. ज्यात कधी या वेळी बिग बॉसच्या घरात दिसणाऱ्या स्पर्धकांची नावे असतात तर, कधी वाईल्ड कार्ड एण्ट्रीबंद्दल अंदाज असतात. आता तर अनेकांसाठी महत्त्वाची असलेली अपडेट आली आहे. ही अपडेट अशी आहे की, हा शो होस्ट करण्यासाठी अभिनेता सलमान खान किती मानधन म्हणून किती पैसे घेणार. विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, BIGG BOSS 13 शो होस्ट करण्यासाठी सलमान खान याला कलर्स वाहिनीकडून तब्बल 403 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम BIGG BOSS 12 च्या तुलनेत तब्बल 100 कोटी रुपयांनी अधिक आहे.

प्राप्त माहितीनुसार, BIGG BOSS 12 होस्ट करण्यासाठी सलमान खान याने कलर्स वाहिनीकडून मानधनाच्या रुपात सुमारे 300 ते 350 कोटी रुपये मिळाले होते. मात्र, BIGG BOSS 13 साठी सलमान खान याने आपल्या मानधनात 100 कोटी रुपयांची वाढ केल्याचे समजते. (हेही वाचा, जेव्हा सलमान खान रेस मध्ये घोड्याला हरवतो! (Watch Video))

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सांगायचे म्हटले तर, ‘बिग बॉस 13’ होस्ट करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सलमान खान 31 कोटी रुपये (दोन एपिसोड) घेणार आहे. साधारण एकूण शोमध्ये 13 विकेंड असतील. या हिशोबाने आकडेमोड करायची तर सलमान खान बिग बॉस सीजन 13 साठी 403 कोटी रुपये घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सलमान खान याला बिग बॉस शो होस्ट करण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत स्वत: सलमान खान अथवा कलर्स वाहिनी किंवा बिग बॉस यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात मानधनाबाबत भाष्य करण्यात आले आहे.