Kaun Banega Crorepati 12: Amitabh Bachchan यांची कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरूवात; शेअर केली खास पोस्ट

कोविड 19 वर मात केल्यानंतर आता बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा कामावर रूजु होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

कोविड 19 वर मात केल्यानंतर आता बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा कामावर रूजु होण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान सोमवार (24 ऑगस्ट) पासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्विझ शो ' कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati ) च्या 12 व्या सीझनला सुरूवात केली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी केबीसीच्या सेट्सवरील काही क्षण शेअर केले आहेत.

दरम्यान 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या 12 व्या सीझनसाठी शूटिंग सुरू झाले आहे. यामध्ये बीग बींच्या फोटोत युनीट निळ्या रंगाच्या पीपीई सूट मध्ये दिसत आहे. Amitabh Bachchan tested Negative for COVID: कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर घरी परतले, ट्वीट करत चाहत्यांचे मानले आभार.  

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

.. it’s back to work .. in a sea of blue PPE .. KBC 12 .. started 2000 .. today year 2020 .. 20 years ! Amaze .. that’s a lifetime !!

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

2000 साली टेलिव्हिजनवर केबीसीला सुरूवात झाली. मागील 20 वर्षात केबीसीचे 11 सीझन झाले आहेत. तर 12व्या सीझनसाठी आता शुटिंग सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान बी यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. बच्चन कुटुंबामध्ये 4 जण कोरोनाच्या विळख्यात होते. मुंबईच्या नानावटी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. आता बॉम्बे हाय कोर्टाने देखील 60 वर्षाच्या पलिकडील कलाकारांना पुरेशी काळजी घेत कामावर परतण्याचा मार्ग खुला केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now