Sunil Holkar Passed Away: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेते सुनील होळकर यांचे निधन; वयाच्या 40 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
सुनीलने अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.
Sunil Holkar Passed Away: टीव्ही जगतातून एक वाईट बातमी येत आहे. टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम अभिनेता सुनील होळकर (Sunil Holkar) चे निधन झाले आहे. सुनीलने अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. 'गोष्ट एक पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात त्यांने शेवटचे काम केले होते. नाटक, चित्रपट आणि टीव्ही शो या तिन्ही माध्यमांतून सुनीलने प्रेक्षकांची मन जिंकली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. पण, त्यांची झुंज अपयशी ठरली. इतक्या कमी वयात अभिनेत्याच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा - Urfi Javed: सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला नोटीस; मुंबई पोलिसांनी घेतली चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल)
सुनील होळकर यांच्या अभिनय प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्यसंस्थेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. सुनील नेहमीच अभिनेता आणि कथाकार म्हणून ओळखला जातो. त्याने 12 वर्षांहून अधिक काळ रंगभूमीत काम केलं. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी निधन होणं ही कलाविश्वासाठी मोठी हानी असल्याचं म्हटलं जात आहे.
सुनील होळकर यांनी 'मोरया' चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. याशिवाय त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या हिंदी मालिकेत त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. सुनील होळकरने एका मित्राला त्याचा शेवटचा संदेश पाठवला होता. यात त्याने ही आपली शेवटची पोस्ट असल्याचं म्हटलं होतं.