अभिनेता पारस छाब्रा याच्या Mujhse Shaadi Karoge मध्ये झळकली मराठी बिग बॉसमधील सुपर हॉट हिना पांचाळ

तर 'मुझसे शादी करोगी' (Mujhse Shaadi Karoge) असे स्वयंवराचे नाव असणार आहे.

Mujhse Shaadi Karoge (Photo Credits-Twitter)

नुकत्याच बिग बॉस सीझन 13 मधून झळकलेले कलाकार पारस छाब्रा (Paras Chhabra) आणि शेहनाज गिल (Shehnaaz Gill) हे दोघे आता स्वयंवर रचणार आहेत. तर 'मुझसे शादी करोगी' (Mujhse Shaadi Karoge) असे स्वयंवराचे नाव आहे. हा शो  कलर्स वाहिनीवर रात्री 10.30 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर स्वयंवर शो साठी आलिशान पद्धतीने घराची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये पारस आणि शहनाज या दोघांसाठी स्थळ येणार आहेत. मात्र या स्वयंवरामध्ये मराठी बिग बॉसमधून झळकलेली सुपर हॉट हिना पांचाळ झळकली आहे. हिना सोबत आलेले अन्य स्पर्धक सुद्धा या स्वयंवर शोसाठी खुप उत्सुक आहेत.

कलर्स वाहिनीने ट्वीट करत मुझसे शादी करोगी या शोची झलक दाखवली आहे. यामध्ये शहनाज आणि पारस त्यांच्या जोडीदाराचा शोध या स्वयंवर मधून घेणार आहेत. स्वयंवरसाठी हिना सोबत जसलिन मथारु हिने सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण मराठी बिग बॉस मध्ये हिनाची एन्ट्री झाल्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्या अदांकडे वळल्या गेल्या होत्या. तर शिवसोबत हिनाचे नाव सुद्धा जोडण्यात आले होते. पण शिव ह्याचे वीणा सोबत नाते जुळल्याने हिनाने मैत्रीणीची भुमिका घेणेच पसंत केले. तर आता शेहनाज आणि पारस यांच्या स्वयंवर मध्ये कोण या दोघांची मन जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(Bigg Boss फेम शेफ पराग कान्हेरे च्या आयुष्यात आला लव्ह तडका; इंस्टाग्राम वर दिली प्रेमाची कबुली)

यापूर्वी कॉन्ट्रॉव्हर्शिल गर्ल म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत आणि राहुल महाजन यांनी सुद्धा स्वयंवर शो मधून लाईफ पार्टनरचा शोध घेतला होता. मात्र या दोघांनी स्वयंवर मधील स्पर्धकासोबत लग्न केले होते. परंतु त्यांचे पार्टनर सोबत जास्त काळ नाते न टिकल्याने त्यांच्यात दुरावा आला होता. तर आता मुझसे शादी करोगी मधून पारस आणि शेहनाज यांच्या स्वयंवर मध्ये कोणाजी बाजी लागते आहे आणि लग्न किती काळ टिकणार हे नक्की पहावे लागणार आहे.