Abhilasha Patil Passes Away: अभिनेत्री अभिलाषा पाटील चं कोरोना उपचारादरम्यान निधन
अभिनेत्री अभिलाषा पाटील हिंदी मराठी सिनेमे, मालिका यांच्यामध्ये काम केले आहे.
कोरोना वायरस दुसर्या लाटेच्या आक्राळविक्राळ रूपामध्ये अनेक कलाकारांनी देखील आपले जीव गमावले आहे. त्यामध्ये तरूण आणि उमदे कलाकारही गेले त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिलाषा पाटील (Abhilasha Patil). अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’, 'बायको देता का बायको' या सिनेमांप्रमाणेच अभिलाषा झी युवा वरील 'बापमाणूस' मालिकेमध्येही झळकली होती. पण एका हिंदी प्रोजेक्टसाठी बनारसला गेलेल्या अभिलाषाला त्रास जाणवू लागल्याने ती मुंबई मध्ये परतली. मुंबईत आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आणि उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली.
बनारसला असताना अभिलाषाला अचानक ताप येऊ लागला. त्यानंतर तिची मुंबईत परतल्यावर कोविड 19 ची चाचणी करण्यात आली. तिची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान प्रकृती खालावत असल्याने अभिलाषाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आयसीयू मध्ये उपचार घेत असतानाच तिचं निधन झालं. अभिनेत्री पल्लवी पाटील हीने अभिलाषाच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियात देत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नक्की वाचा: Amol Dhavade Passes Away: अभिनेते अमोल धावडे यांचे कोरोनामुळे निधन; प्रविण तरडे यांनी शेअर केली भावूक पोस्ट.
पल्लवी पाटीलची पोस्ट
सध्या महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत चित्रीकरणाला बंदी आहे. त्यामुळे हिंदी- मराठी मालिका, रिएलिटी शोज ने त्यांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर हलवलं आहे. अभिलाषा देखील एका हिंदी मालिकेसाठी बनारसला होती.
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी प्रमाणे देशभर पसरत आहे. महाराष्ट्रात आता कोरोना रूग्ण वाढीचा दर मंदावला आहे पण इतर राज्यांत अजूनही कमी-जास्त प्रमाणात रूग्ण वाढत असल्याने मागील काही दिवसांपासून सातत्याने देशात साडेतीन लाखांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.