अंगावर शहारे आणणारा 'तुंबाड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडीओ)
अंगावर शहारा आणणारा ‘तुंबाड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरवरून हा चित्रपट अतिशय गूढ आणि रहस्यमय म्हणजेच हॉरर मिस्ट्री असल्याचे जाणवते
अंगावर शहारा आणणारा ‘तुंबाड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरवरून हा चित्रपट अतिशय गूढ आणि रहस्यमय म्हणजेच हॉरर मिस्ट्री असल्याचे जाणवते. या चित्रपटाची निवड व्हेनिस फिल्म फेस्टिवलसाठी झाली होती. येत्या 12 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हॅपी भाग जायेगी, रांझना, तनु वेड्स मनू अशा गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आनंद एल राय हे तुंबाडचे निर्माते आहेत.
तुंबाडची कथा 1920 या काळातली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठीत ब्राहमण कुटुंबातील तीन पिढ्यांभोवती ही कथा फिरते. चित्रपटाचे साऊंड इफेक्ट्स आणि सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
या चित्रपटात सोहम शाह, ज्योती मालशे, अनिता दाते, दिपक दामले यांच्या प्रमुख भूमिका असून, राही अनिल बर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement