To Kill A Tiger On Netflix: ऑस्कर नामांकित डॉक्युमेंटरी फिल्म 'टू किल अ टायगर' आता नेटफ्लिक्सवर
"टू किल अ टायगर" या चित्रपटाला नुकत्याच झालेल्या 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळालेला आहे, आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे, जाणून घ्या अधिक माहिती
To Kill A Tiger On Netflix: "टू किल अ टायगर" या चित्रपटाला नुकत्याच झालेल्या 96 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी नामांकन मिळालेला आहे, आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून प्रेक्षकांना तो घरी बसून पाहता येणार आहे. ‘टू किल अ टायगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन सेहरावत यांनी केले आहे. हा चित्रपट एका शेतकऱ्याची कथा सांगतो ज्याची मुलगी एका भयानक गुन्ह्याची शिकार बनते. एक शेतकरी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक परंपरा मोडून एक विलक्षण प्रवासाला निघतो.
पाहा पोस्ट:
जर तुम्हाला दमदार कथा आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मितीची आवड असेल, तर "टू किल अ टायगर" तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. हा चित्रपट तुम्हाला केवळ रोमांचित करणार नाही तर समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींचा खोलवर विचार करण्यास भाग पाडेल. या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्राने केली आहे.