या सावळ्या अभिनेत्री गाजवत आहेत बॉलीवूडवर अधिराज्य

सुंदरता ही तुमच्या रंगात नसून ती पाहणाऱ्याच्या डोळ्यात आहे, तुमच्या व्यक्तीमत्वात आहे, तुमच्या कामात आहे हे बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या काही सावळ्या वर्णाच्या नायिकांनी सिद्ध केले

शिल्पा शेट्टी आणि काजोल (संग्रहित - संपादित प्रतिमा)

चित्रपटसृष्टी आणि सौंदर्य यांचे फार जवळचे नाते आहे. त्यातल्या त्यात उजळ चेहऱ्यालाच सर्वांची पसंती असते. म्हणूनच गेली कित्येक वर्षे चालू असलेला वर्णभेद आजही बॉलीवूडमध्येही दिसून येतो. एकीकडे ‘ब्लॅक इज ब्युटीफुल’ म्हणायचे आणि दुसरीकडे फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करायच्या, हा प्रकार तर सर्रास दिसून येतो. मात्र सुंदरता ही तुमच्या रंगात नसून ती पाहणाऱ्याच्या डोळ्यात आहे, तुमच्या व्यक्तीमत्वात आहे, तुमच्या कामात आहे हे बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या काही सावळ्या वर्णाच्या नायिकांनी सिद्ध केले. एकेकाळी सावळ्या म्हणून हिणवल्या गेलेल्या या नायिका फक्त त्यांच्या कामामुळेच आज बॉलीवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावू शकल्या. आश्चर्य म्हणजे आज यांच्याकडे पहिले तर वाटणारही नाही की या अभिनेत्रींनासुद्धा वर्णभेदाचा सामना करावा लागला असेल. चला तर पाहूया कोणत्या आहेत या अभिनेत्री.

काजोल – चित्रपटसृष्टीमधील बोलके, चुलबुले व्यक्तिमत्व म्हणजे काजोल. बेखुदी या चित्रपटामधून पदार्पण केल्यांनतर, बाजीगर चित्रपटावेळी काजोलला अक्षरशः काळी म्हणून हिणवले गेले. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आज इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनातील काजोलचे स्थान अढळ आहे.

काजोल

प्रियंका चोप्रा – 2018 हे प्रियंका चोप्राचे अफेअर आणि लग्न यांमुळे गाजले. आज प्रियंका एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आहे. जगभरात तिचे करोडो चाहते आहेत. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल सावळी असल्याने बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी प्रियंकाला स्ट्रगल करावा लागला होता. जेव्हा ती मिस वल्र्ड झाली तेव्हाही तिची त्वचा सावळीच होती. मात्र नंतर हळू हळू स्वतःला ग्रूम करत प्रियंका या पायरीपर्यंत पोहचली.

प्रियंका चोप्रा

दीपिका पदुकोन – बॉलीवूडमधील आजच्या घडीची सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोन. आज दीपिकाच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. मात्र याआधी दीपिकाचा स्कीन टोन सावळ्या रंगात मोडत होता. मात्र नाकीडोळे नीटस असलेल्या दीपिकाची सुंदरता तिच्या चित्रपटांसोबत वाढत गेली.

दीपिका पदुकोन

शिल्पा शेट्टी – बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिल्पा शेट्टी. मात्र चित्रपटसृष्टीमध्ये येण्याआधीचा तिचा फोटो पहिला तर तुम्हाला धक्का बसेल. पूर्वीची शिल्पा आणि आजची शिल्पा यांमध्ये बराच फरक आहे. आंतरराष्ट्रीय शो ‘बिग ब्रदर’ची शिल्पा शेट्टी विजेती आहे, मात्र या शो दरम्यानही शिल्पा शेट्टीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता.

शिल्पा शेट्टी

बिपाशा बसू – हॉट आणि बोल्ड अभिनेत्री बिपाशा बसू हीदेखील सावळी आहे. मात्र आपले व्यक्तिमत्व, अभिनय यांच्या जोरावर आज बिपाशाचे बॉलीवूडमध्ये नाव आहे. बिपाशाला आपल्या रंगाचा अभिमान आहे, म्हणूनच जेव्हाही ती स्क्रिनवर येते तिच्यामधील आत्मविश्वास दिसून येतो.

बिपाशा बसू