कंगणाच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर ज्येष्ठ अभिनेते 'विक्रम गोखलें'कडून समर्थन, वाचा काय म्हणाले..

कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते भिकेनेच मिळालं आहे.

Kangana & Vikram Gokhale (Photo Credit - Instagram)

कंगनाने (Kangana Ranaut) काही दिवसापुर्वी एक वादग्रस्त विधान केले होते कि भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती, भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. असे वक्तव्य केल्याने तिच्यावर सगळीकडून जोरदार टिका करण्यात आली होती. पण याच कंगणाच्या वादग्रस्त विधानाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन दर्शविले आहे त्यामुळे या वादाला नवीन फोडणी मिळाली असे दिसुन येत आहे.

पुण्यात ब्राह्मण महासंघाच्यावतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि कंगणाच्या वादग्रस्त विधानाला त्यांनी समर्थन दिल. कंगना रनौत जे म्हणाली आहे की, १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते भीक म्हणून मिळालं आहे, त्या वक्तव्याला माझं समर्थन आहे. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, ते भिकेनेच मिळालं आहे. स्वातंत्र्य ज्या योद्ध्यांनी मिळविण्याचा प्रयत्न केला, ते फाशीवर जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं गेल नाही. ब्रिटीशांच्या विरोधात हे लोक उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं गेल नाही. असे लोक केंद्रीय राजकारणामध्ये होते, असं गोखलें यांनी  आपले मत मांडले आहे. (हे ही वाचा Nawab Malik Press Conference: वक्फ बोर्ड, कंगना रनौत, एसटी संप, ड्रग्ज प्रकरणांवरुन नवाब मलिक यांचे भाजपवर शरसंधान.)

तसेत यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुकही केलं आणि शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल, असंही बोलून दाखवलं. कंगनाच्या विधानाशी सहमत आहे, भीक मागूनच मिळालेलं आहे ते. मतपेटीचं राजकारण सुरू झाल्यापासून वादला काही कमी नाही. कुठल्याही अगदी फडतूस कारणावरून वाद निर्माण होतात असेही विक्रम गोखले यांनी म्हटल आहे.