सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची 6 वर्षांची नात दियाने गायिलेल्या 'माझा बाप्पा किती गोड दिसतो' गाण्याला मिळाले 15 लाखांहून अधिक व्ह्यूज, Watch Video
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे गाणं युट्यूबर प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रवीण कोळी यांनी या गाण्याची निर्मिती केली असून प्रवीण कोळी आणि योगिता माळी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक सुरेल आणि हिट गाणी देणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा वारसा पुढे चालविण्यासाठी त्यांची 6 वर्षांची नात दिया (Deeya Wadkar) पुढे सरसावली आहे. दियाच्या सुंदर आवाजातील 'माझा बाप्पा किती गोड दिसतो' (Maza Bappa Kiti God Disto) हे गाणे सध्या सोशल मिडियावर प्रचंड गाजतयं. युट्यूबवर आलेल्या सुंदर गाण्याला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दियाने गायलेले हे पहिलेच गाणे असून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. तिच्या गोड गळ्याने अनेकांची मने जिंकली आहेत.
कोळीवुड प्रोडक्शनने हे गाणं निर्मिती केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे गाणं युट्यूबर प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रवीण कोळी यांनी या गाण्याची निर्मिती केली असून प्रवीण कोळी आणि योगिता माळी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. रितेश देशमुख ची मुले रियान आणि राहिल ने कागदाच्या बोळ्यापासून घडवली 'ही' सुंदर इको फ्रेंडली गणेश मूर्ती, Watch Viral Video
या गाण्याचे संपूर्ण चित्रीकरण बेलापूरसहित रायगड जिल्ह्यातील पेण, गोरगाव आणि रसायनीमध्ये करण्यात आले आहेत. या गीताचे संगीत संयोजन तेजस पाडावे यांनी केले आहे. दियाने गायिलेल्या बाप्पाच्या या गाण्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील रसिकांची मने जिंकली.
जेष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award 2020) जाहीर करण्यात आला आहे. सुरेश वाडकर यांना 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर 2011 साली त्यांना मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढेच नव्हेतर मध्य प्रदेश सरकारनेही त्यांना प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्काराने गौवरण्यात आले होते.