IPL Auction 2025 Live

Shahid Kapoor त्याच्या पिढीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक; वडील Pankaj Kapoor यांची पोचपावती

पंकज कपूर म्हणतात,''शाहिद त्याच्या पिढीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे आणि मी हे एक बाप म्हणून म्हणत नाहीये. तर हे सत्य आहे.

Shahid Kapoor Pankaj Kapoor | (Facebook)

शाहिद कपूरने 'इश्कविश्क' मधून पदार्पण केलं आणि त्यानंतर 'कमीने', 'जब वी मेट', 'हैदर' सारख्या अनेक उत्तम चित्रपटात काम केलं. पण शाहिदला आयुष्यातील सर्वात मोठ्या हिट साठी 2019 पर्यंत वाट पाहावी लागली. या वर्षी आलेल्या कबीर सिंगने छप्परतोड कमाई करत शाहिदचं चित्रपटसृष्टीतील वजन अजूनही शाबूत असल्याचं दाखवून दिलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदचे वडील पंकज कपूर यांनी त्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे.

पंकज कपूर म्हणतात,''शाहिद त्याच्या पिढीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे आणि मी हे एक बाप म्हणून म्हणत नाहीये. तर हे सत्य आहे. कारण त्याने हे 'पद्मावत', 'हैदर' आणि 'कबीर सिंग' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून वारंवार सिद्ध केलेलं आहे. आपल्या कारकीर्दीच्या बाबतीत शाहिद हा माझ्यापेक्षा खुप चालाख आहे. त्याने आधी नाव कमावलं आणि नंतर चांगल्या दर्जाच्या भूमिका त्याच्याकडे आपसूकच येत गेल्या. हा अत्यंत हुशार निर्णय होता." (हेही वाचा. शाहिद कपूर - मीरा कपूरचा मुलगा Zain Kapoor ची पहिली झलक सोशल मीडीयावर व्हायरल)

पंकज कपूर हे नाटका मधील अत्यंत आदराचं नाव. नाट्यसृष्टीसाठी त्यांचं योगदान अमूल्य आहे. परंतू एक चित्रपट अभिनेता म्हणून ते तितकंसं यश मिळवू शकले नाहीत. पण शाहिद कपूरची कारकीर्द मात्र काहीशी वेगळी ठरली. त्यानेही अनेक चढ उतार पाहिलं. परंतु योग्य वेळी त्याने दणक्यात पुनरागमन देखील केले. त्यामुळेच आज कारकीर्दीला 15 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याने सिनेमासृष्टीमध्ये आपला स्वतःचं असं स्थान निर्माण केले आहे. सध्या तो जर्सी या दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकमध्ये व्यस्त आहे. यात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा 2020 च्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होत आहे.