Karan Arjun Re-release in Cinemas: शाहरुख आणि सलमान खान स्टारर 'करण-अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार, सलमान खानकडून व्हिडिओ शेअर

Karan Arjun Movie: सलमान खान आणि शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्लॉकबस्टर 'करण अर्जुन' 29 वर्षांनंतर पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Photo Credit- X

Karan Arjun Re-release in Cinemas: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान (Salman Khan)यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'करण अर्जुन' (Karan Arjun) पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी 'करण अर्जुन' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. बॉलीवूडचे दोन सुपरस्टार सलमान आणि शाहरुख खान(Shahrukh Khan) यांचा हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता.

राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते. त्यांनी या चित्रपटाचा नवीन एक मिनिटाचा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये पुनर्जन्म आणि बदलाची कथा दाखवण्यात आली आहे. यासोबतच सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा नवीन टीझरही शेअर केला आहे. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “राखी जी बरोबर होत्या, म्हणाल्या की माझा करण अर्जुन येईल… 22 नोव्हेंबरला जगभरातील सिनेमागृहांमध्ये चित्रपट येणार आहे.

या चित्रपटात शाहरुख आणि सलमानशिवाय राखी, काजोल, ममता कुलकर्णी आणि अमरीश पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आईचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेणाऱ्या दोन भावांची ही कथा आहे. 'करण-अर्जुन' चित्रपट त्याच्या संगीतांसाठी देखील ओळखला जातो. राकेश रोशनने यांनी आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले की, 'करण अर्जुन येत आहे. (Neena Kulkarni Death Rumours: अभिनेत्री निना कुळकर्णी यांच्या निधनाच्या चर्चा केवळ अफवा, बातम्याही निराधार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

22 नोव्हेंबर 2024 पासून, तुम्ही सर्व जगभरातील थिएटरमध्ये पुनर्जन्माचे साक्षीदार होणार आहात.'हा चित्रपट 1995 साली ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम यश मिळवले आणि 50 आठवडे चमकदार कामगिरी केली. 'करण अर्जुन'च्या डायलॉग्स आणि गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर ते आजही गाणी अनेकांच्या ओठावर आहेत. 'मेरे करण अर्जुन आएंगे' किंवा 'भाग अर्जुन भाग' हा डायलॉग असो, जो सर्वांना आवडला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now