Sachin Tendulkar ची लेक Sara Tendulkar एन्जॉय करतेय गोवा; पहा तिचे मोहक फोटोज

पण सोशल मीडीयात अनेकदा तिच्या स्टायलिश अंदाजाची आणि मोहक सौंदर्याची चर्चा होत असते.

सारा तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आजकाल तिच्या मनमोहक सौंदर्याने आणि फोटोस सर्वांची मने जिंकत आहे. सोशल मीडियावर तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी इंटरनेटवर ती खळबळ माजवत असून लोकांमध्येही ती खूप चर्चेत आहे. ती इंटरनेटवर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते, ज्यामध्ये ती अतिशय स्टायलिश अंदाजात दिसत आहे. सारा तेंडूलकर स्टाईल आयकॉन म्हणूनही ओळखली जाते. साराचे वडील सचिन तेंडूलकर असले तरी साराने तिच्या ड्रेसिंग स्टाईल मुळे स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.

साराच्या ड्रेसिंग style चे अनेक चाहते आहेत आणि बरेच जण तिची ड्रेसिंग style फॉलो करतांना दिसतात.सारा तिच्या सौंदर्यामुळे देखील लोकांमध्ये ओळखली जाते यात शंका नाही. बुधवारी साराने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये ती कॉफी आणि सॅलडचा आस्वाद घेताना दिसत आहे. सारा सध्या गोवा मध्ये सुट्टी चा आनंद घेतांना दिसून येत आहे.साराने नुकतेच पोस्ट केलेले फोटो गोवा येथीलच आहेत. पोस्ट केलेल्या फोटो मध्ये ती चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि हातात फुलांचा गुच्छा घेऊन पोज देताना दिसली.

सारा तेंडुलकर पोस्ट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

तिने फोटोला कॅप्शन देत लिहिले, Hello Goa..या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आणि फोटो पोस्ट केल्यावर तिला तिच्या चाहत्यांच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या..या फोटो मध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटो मध्ये ती डायनिग टेबल वर जेवणाचा आस्वाद घेतांना दिसून आली तिने त्या फोटोला कॅप्शन दिले की "हसत आहे कारण मी सॅलड ड्रेसिंग पाहिले आहे." साराने नुकतेच मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. तिचा मॉडलिंगचा एक प्रोमो व्हिडिओ देखील दिसला ज्यामध्ये ती अभिनेत्री बनिता संधू आणि अहान तानिया श्रॉफसोबत दिसली.मॉडलिंग नंतर ती चित्रपटांमध्ये पदार्पण करेल का? अशी उत्सुता निर्माण झाली आहे.मध्यंतरी सारा चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असे सांगण्यात येत होते परंतु स्वतः सचिन तेंडूलकरने या अफवा असल्याचे सांगितले आहे. आणि तेव्हापासून पदार्पणाच्या विषयाला पूर्णविराम लागला आहे