आता 'संजय दत्त'ची मराठीमध्ये एन्ट्री; चित्रपटाचे शुटींग सुरु, नावाचा शोध अजून चालू
स्वत: संजय दत्तने ट्विट करून ही माहिती दिली आहे
मराठी चित्रपटाचे बदलणारे रूप, हाताळले जाणारे विविधांगी विषय, वास्तववादी चित्रण यांमुळे बॉलीवूडलादेखील मराठी चित्रपटांची भुरळ पडली नसावी यात नवल ते कोणते. म्हणूनच प्रियंका चोप्रा, रितेश देशमुख, अजय देवगण, जॉन अब्राहम असे अनेक मोठे कलाकार मराठी चित्रपटांकडे वळताना दिसतात. यातच आता अजून एका मोठ्या नावाची भर पडली आहे ते म्हणजे, संजय दत्त.
सलमान खान, शाहरुख़ खान, आमिर खान, अक्षय कुमार यांसारख्या अनेक कलाकारांच्या स्वतःच्या निर्मिती संस्था आहेत. आता संजय दत्तही आपल्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटांमध्ये उतरत आहे. स्वत: संजय दत्तने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ब्लूमस्टँग प्रॉडक्शनसोबत संजय दत्त हा मराठी सिनेमा निर्मित करतोय. या सिनेमात अभिजीत खांडकेकर, दीपक धोब्रिया, स्पृहा जोशी आणि नंदिता धुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर राज गुप्त चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. सिनेमाच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही, मात्र चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.
याशिवाय संजय दत्त 2010 सालचा ‘प्रस्थान’म या तेलगू सिनेमाच्या हिंदी रिमेकची निर्मिती करत आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. सिनेमाचा मुहूर्त नर्गिसच्या जन्मदिनी झाला होता, तर सिनेमाचे शूटिंग सुनील दत्त यांच्या जन्मदिनी सुरू केले होते. प्रस्थानम सिनेमात संजय दत्तची मुख्य भूमिका आहे. मनीषा कोईरला या सिनेमात संजय दत्तच्या पत्नीची भूमिका करत आहे.