Salman Khan: 'हा तर वांद्राचा विन डिझेल'; सलमान खान याचा टक्कल असलेला फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया

त्याशिवाय, तो शर्टलेस असून त्याने लेदर जॅकेट घातलेला दिसत आहे.

Photo Credit -Reddit

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान(Salman Khan)याचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि निखील द्विवेदी (Nikhil Dwivedi)सोबत आहे. फोटो रेडीटवर व्हायरल झाला आहे. ज्यात सलमानने टक्कल (Salman Khan Bald Photo) केल्याचे दिसत आहे आणि तो शर्टलेस असून त्याने लेदर जॅकेट घातलेला दिसत आहे. हा फोटो पाहून एकाने 'हृतिकला मागे टाकले,असे करणे कठीण आहे!', असे लिहिले. तर दुसऱ्या नेटकऱ्याने "त्याच्याकडे फेस कार्ड आहे, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर काहीही प्रयोग केले जातात", असे लिहिले. तिसऱ्याने,'हा तर वांद्राचा विन डिझेल' असल्याचे लिहिले आहे. आणखी एका चाहत्याने 'हे किती वर्षांचे आहे?' अशी कमेंट केली.

दरम्यान, युकेचे खासदार बॅरी गार्डिनर यांनी एक्सवर सलमान खानसोबतचे काही फोटो शेअर केला आहे. ज्यात सलमान खानने तेच जॅकेट घातल्याने सध्या त्यासंबंधीत असलेला सलमानचा जुना फोटो व्हायरल झाला आहे. गेल्या महिन्यात सलमान खान याच्या घराबाहेर दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तो लंडनला गेला. तेव्हा हा फोटो क्लिक करण्यात आला. एक्सवर हा फोटो क्लिक करताना "टायगर जिवंत आहे आणि लंडनमध्ये आहे. आज @BeingSalmanKhan चे वेम्बलीमध्ये स्वागत करताना आनंद होत आहे."असे कॅप्शन त्यांनी दिले.

फोटोंमध्ये, सलमान खान आणि बॅरी गार्डनर गप्पा मारताना आणि हसताना दिसत आहेत.एप्रिलमध्ये मुंबईत सलमान खानच्या घराबाहेर दोघांनी गोळीबार केला होता. मुंबई गुन्हे शाखेला लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत, त्यानंतर गुन्हे शाखेने दोघांनाही या प्रकरणात सर्वाधिक वाँटेड संशयित म्हणून घोषित केले. गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 6 जणांना अचक केली आहे. त्याशिवाय, सलमान खानची सुरक्षा Y-Plus वर वाढवण्यात आली आहे.

येथे पोस्ट पहा:

Bald Bhai was still a looker

byu/sidroy81 inBollyBlindsNGossip



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif