सैफ अली खान पुन्हा एकदा वेब सिरीजमध्ये; अली अब्बास झफरसोबत करणार 'तांडव'
सेक्रेड गेम्स नंतर आता अली अब्बास जफर दिग्दर्शित तांडव या मालिकेत तो काम करणार आहे.
'सेक्रेड गेम्स 'च्या (Sacred Games) यशानंतर सैफ अली खान (Saif Ali Khan) आपली पुढची वेब सिरीज 'तांडव ' साठी सज्ज झाला आहे. 'टायगर झिंदा है ' (Tiger Zinda Hai) चा दिग्दर्शक अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) या सिरीजचं दिग्दर्शन करणार आहे. हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्सच्या वेळी सुरवातीच्या काळ्यात वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या बॉलीवूडच्या काही निवडक अभिनेत्यांपैकी सैफ एक ठरला होता.
तांडवची पार्श्वभूमी राजकीय असणार आहे. सैफ त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एखाद्या नेत्याचं काम करणार आहे. "माझी भूमिका काहीशी चाणक्य सारखी आहे. एका प्रतिष्ठित घराण्यातून आलेल्या आणि पंतप्रधान होण्याची उच्च असलेल्या एका तरुण मुलाचं पात्र मी साकारत आहे", असे तो म्हणाला. (हेही वाचा. सत्यघटनेवर आधारित 'द स्काय इज पिंक' आणि 'लूटकेस' येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला.)
सिरीजच्या कथेबद्दल विचारले असता, सैफ म्हणाला,"हि एक राजकीय मालिका असेल आणि निर्मितिसूत्र मोठ्या प्रमाणावर असेल. हि काहीशी नेटफ्लिक्सची सिरीज 'हाऊस ऑफ कार्ड्स'च्या धाटणीची असेल, पण तरीही ती पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनाने मांडली. दलित राजकारण आणि उत्तरप्रदेश मधील पोलीस व्यवस्था या दोहोंमधील ताणले गेलेले संबंध आणि त्यांच्यातील तणाव , आपल्याला यात पाहायला मिळेल." (हेही वाचा. 'ये पब्लिक है, ये सब जानती है', मासेस आणि क्लासेस मधल्या विवादावर एक नजर.)
अली अब्बास झफरचं वेबसीरिजच्या दुनियेमध्ये हे पदार्पण आहे, तर सैफने सिनेमे आणि सिरीज दोन्ही सांभाळत आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. पुढच्या आठवड्यात सैफचा 'लाल कप्तान ' (Laal Kaptaan) हा चित्रपट रिलीज होतो आहे.