Richa And Ali Daughter Pic: रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लेकीची पहिली झलक; खास पोस्ट शेअर

रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर केला. आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं कोलॅब म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Photo Credit- Instagram

Richa And Ali Daughter Pic: बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांना 16 जुलै रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीच्या जन्माची गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांनीही आई-बाबाच्या भूमीकेत प्रवेश केला. नुकतच रिचा आणि अलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्यांच्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर केला. 'आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं कोलॅब म्हणत एक पोस्ट शेअर करत आहोत. आम्ही खूपच धन्य झालो आहोत. आमची गोंडस परी आम्हाला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यस्त ठेवत आहे. आमच्या लेकीला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मन:पुर्वक आभार आहेत.', असे म्हणत दोघा अभिनेत्यांनी लेकीच्या फोटोला कॅप्शन दिले. (हेही वाचा:Janhvi Kapoor Discharged: जान्हवी कपूरला रुग्णालयातून डिस्चार्ज; अन्नातून झाली होती विषबाधा )

'फुकरे' चित्रपटाच्या सेटवर २०१२ मध्ये दोघांचीही भेट झाली होती. तेव्हा त्यांची फ्रेंडशिप झाली होती. पण त्या फ्रेंडशिपचे रुपांतर नंतर रिलेशनशिपमध्ये झाले. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर दोघांनी लग्न केले. दरम्यान, रिचा हिंदू असून अली मुस्लमान आहे. त्यांच्या लग्नावेळीही अनेकांनी रिचाला ट्रोल केले होते. दरम्यान, अली फजलच्या कामाबद्दल बोलायचे तर, गेल्या काही दिवसांपासून अली फजल 'मिर्झापूर ३'मुळे चर्चेत आहे. तर रिचा चड्ढा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरामंडी' सीरीजमुळे चर्चेत आली आहे.

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

रिचा आणि अलीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केलेला आहे. यामध्ये तापसी पन्नु, प्रियंका चोप्रा, अर्चना पुरण सिंह, जिम्मी शेरगिल, नील मुकेश, नीती मोहन, स्वरा भास्कर, नेहा भसीनसह अनेक सेलिब्रिटींनी रिचा आणि अलीवर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement