सुशांत सिंह राजपूत याच्या निधनावर रिया चक्रवर्तीची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाली?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. आज सुशांतचे निधन होऊन एक महिना झाला आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनावर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने एक भावनिक पोस्ट केली आहे. सुशांतच्या आठवणीने भावूक झालेल्या रियाने तिच्या व्हॉट्सअॅपचा डीपीही बदलला असून तिने तिचा आणि सुशांतचा फोटो ठेवला आहे.
सुशांतने आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच रियाला धक्काच बसला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियापासून दूर गेली होती. तसेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा कमेंट सेक्शन प्रायवेट केला होता. आता रियाने सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदा पोस्ट लिहिली आहे.‘तूच एक असा व्यक्ती होता ज्याने मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवले आणि प्रेमाची ताकद दाखवून दिली होती. एखाद्या सामान्य गणिताचे समीकरण जीवनाचा अर्थ कसा उलगडू शकेल, हे तू मला शिकविले...आणि दररोज मी तुझ्या कडून नवीन गोष्टी शिकले’ या आशयाची पोस्ट तिने लिहिले आहे. हे देखील वाचा- Amitabh Bachchan Health Update: कोरोनाच्या लढाईत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत होतोय सुधार; नानावटी रुग्णलयातून समोर आली 'ही' माहिती
रिया चक्रवर्तीची इन्स्टाग्राम पोस्ट-
प्रॉपर्टी डिलर सनी सिंहने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आणि रिया नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार होते. तसेच रियाने लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी प्रॉपर्टी डिलरला घर पाहण्यासाठी सांगितले होते. परंतु, पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले? या मागचे नेमके कारण काय? असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2020 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

